हैदराबाद - बुधवारी अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी संध्या थिएटर घटनेत जखमी झालेल्या मुलाची भेट घेण्यासाठी हैदराबादच्या रुग्णालयाला भेट दिली. 4 डिसेंबरपासून रुग्णालयात दाखल असलेल्या या मुलाची प्रकृती जाणून घेण्यासाठी तेलंगणा राज्याचे आरोग्य सचिव क्रिस्टीना झेड चोंगथू आणि हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. आनंदही त्यांच्याबरोबर गेले होते.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडलेल्या घटनेत मुलाने आपली आई गमावली होती आणि त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. प्रसिद्ध पीआर एलुरु श्रीनू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अल्लू अरविंद हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना दिसत आहेत.
"गेल्या 14 दिवसांपासून जखमी मुलावर उपचार सुरू असून गेल्या 10 दिवसात त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पंरतु त्याला पूर्ण बरं वाटण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आम्ही मुलासाठी आवश्यक ते सर्व करण्यास तयार आहोत. ...,"असं अल्लू अरविंद यांनी सांगितलं. एलुरु श्रीनू यांच्या म्हण्यानुसार, अल्लू अरविंद यांनी असेही नमूद केलं की, "चालू असलेल्या खटल्याशी संबंधित कायदेशीर निर्बंधांमुळे, अल्लू अर्जुन सध्या त्या जखमी मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला भेटू शकत नाही.," असं अल्लू अरविंद यांनी म्हटलंय.