मुंबई - Alia Bhatt Book :अभिनेत्री आलिया भट्ट ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियानं चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयानं लोकांची मनं जिंकली आहेत.आता आलियानं कहाणीच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवलं आहे. याची माहिती खुद्द आलियानं तिच्या सोशल मीडियावरून दिली आहे. तिनं आपल्या पहिल्या पुस्तकाची झलकही चाहत्यांना दाखवली. आलियानं छोट्या मुलांसाठी पहिलं 'पिक्चर बुक' लॉन्च केलं.
आलिया भट्टनं केली पोस्ट शेअर :या पुस्तकाबद्दल माहिती देताना तिनं लिहिलं, "एक नवीन साहस सुरू, 'एडी फ्रेंड्स अ होम' विश्वातील पुस्तकांच्या नवीन मालिकेची सुरूवात झाली आहे. माझे बालपण काही कथनांनी भरलेले होते. एके दिवशी त्या मुलीला बाहेर आणण्याचे माझे स्वप्न होते. मी मुलांसाठी पुस्तकात काढले. माझे सहकारी कथाकार, यांची मी आभारी आहे. त्यांच्या अद्भुत कल्पना आणि इनपुटनं आमचे पहिले पुस्तक तयार झाले." आता या पोस्टवर अनेकजण तिला कमेंट्स करून शुभेच्छा देताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, आलिया तुझ्या नवीन सुरुवातीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मी नक्की हे पुस्तक माझ्या मुलासाठी घेईल." आणखी एकानं लिहिलं, "मी छोटा मुलगा नाही आहे, पण तरी मी हे पुस्तक नक्की वाचेल." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.