मुंबई - Ali Fazal Thug Life : अभिनेता अली फजल मणिरत्नमच्या 'ठग लाइफ' या तमिळ चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कमल हासन आणि मणिरत्नम करत आहेत. याशिवाय कमल हासन हे या चित्रपटात कामही करणार आहे. 'ठग लाइफ' चित्रपटामध्ये सिलांबरसन उर्फ सिम्बू, त्रिशा कृष्णन, नस्सर, जोजू जॉर्ज, अशोक सेल्वन आणि ऐश्वर्या लक्ष्मी हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान अली फजलनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "मणी सरांच्या 'ठग लाइफ'च्या व्हिजनचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी फक्त आशा करू शकतो की मी या चित्रपटात काही चांगलं करेल. कमल हासन सरांबरोबर काम करणं माझ्यासाठी सन्मानची गोष्ट आहे. यासाठी मी खूप आभारी आहे, माझ्यावर ही भूमिका सोपवल्याबद्दल मी मणी सरांचे आभार मानतो."
'ठग लाइफ'मध्ये अली फजलची एंट्री :याशिवाय त्यानं पुढं लिहलं, "माझी भूमिका पडद्यावर जिवंत आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."दरम्यान 'ठग लाइफ' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे. 'ठग लाइफ' हा तमिळ-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी मणिरत्नम आणि कमल हासन यांनी लिहिली आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज आणि रेड जायंट मूव्हीज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 'ठग लाइफ' चित्रपटामध्ये कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणार आहे. याआधी या चित्रपटामधील एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडलाच्या दिसलं.