मुंबई - Akshay Kumar:अभिनेता अक्षय कुमार हा 90च्या दशकातील असा एकमेव अभिनेता आहे, जो एका वर्षात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक चित्रपट करतो. अक्षय कुमारच्या नावावर सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देण्याचा टॅगही आता लागलं आहे. कोविड - 19 पासून अक्षय कुमारनं एकापाठोपाठ अनेक फ्लॉप चित्रपट दिली आहेत. नुकताच अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. 'सरफिरा' चित्रपट 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 30 कोटींची कमाईही करू शकलेला नाही.
अक्षय कुमार फ्लॉप चित्रपट झाल्यामुळे केलं दु:ख व्यक्त : मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारनं एका मुलाखतीत बॉक्स ऑफिसवरील अपयशावर आपले मौन सोडले आहे. अक्षयनं यावर म्हटलं, "चित्रपट बनवताना रक्त आणि घाम निघतो, पण चित्रपट फ्लॉप झाला तर मन दुखावलं जातं, आपण सकारात्मक राहायला शिकलं पाहिजे, कारण अपयशच यशाचं महत्त्व सांगतं. मी नशीबवान आहे की, अपयशाला सामोरे जाण्यासाठी मी खूप आधीपासून तयारी केली होती, कारण चित्रपटाचे नशीब आपण बदलू शकत नाही." पुढं त्यानं म्हटलं, "आम्ही फक्त कठोर परिश्रम करू शकतो, स्वतःला बदलू शकतो. माझे सर्वोत्तम देऊ शकतो, अशा प्रकारे मी माझी उर्जा खर्च करतो. हे आमच्या नियंत्रणाबाहेर आहे." आता पुढं अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाकडून आशा आहे. आता सध्या 'सिंघम अगेन' खूप चर्चेत चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अक्षय हा छोटीशी भूमिका साकारणार आहे. 'सिंघम अगेन' दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलंय.
कोविड नंतर अक्षय कुमारचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले
सरफिरा (2024)
बडे मियां छोटे मियां (2024)
मिशन रानीगंज (2023)
सेल्फी (2023)
राम सेतू (2022)
कटपुतली (2022)
रक्षा बंधन (2022)
सम्राट पृथ्वीराज (2022)
बच्चन पांडे (2022)