मुंबई - प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी देशाविदेशातून मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या भाविकांच्या संख्येत सेलिब्रिटींचीही अभूतपूर्व गर्दी दिसून येत आहे. सोमवारी बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ त्रिवेणी संगमात पवित्र विधीमध्ये सामील झाले.
२०१९ मध्ये झालेल्या गेल्या वेळच्या कुंभमेळ्यापासून झालेल्या सुधारणांवर प्रकाश टाकत अक्षय कुमारनं यंदाच्या प्रशासनाच्या कामाबाबात समाधान व्यक्त केलंय. त्रिवेणी संगममधील विधी पूर्ण केल्यानंतर, अक्षयनं प्रशासनानं ठेवलेल्या व्यवस्थेचं कौतुक केलं आणि म्हटलं की, "इथं इतक्या चांगल्या व्यवस्था केल्याबद्दल मी मुख्यमंत्री योगीजींचे आभार मानतो... सुविधा उत्कृष्ट आहेत आणि सर्वकाही खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आहे."
आपल्या मागील अनुभवांवर विचार करताना, अक्षय कुमारनं मागच्या कुंभमेळ्याची आठवण करून दिली आणि म्हटलं, "मला अजूनही आठवतं की २०१९ मध्ये कुंभमेळा झाला तेव्हा लोक स्वतःच्या समानाचे गठ्ठे आणत असत... पण आता अंबानी, अदानी आणि प्रसिद्ध कलाकार यासारख्या अनेक प्रभावशाली व्यक्ती इथं येत आहेत. यावरून व्यवस्था किती चांगली आहे हे दिसून येतं."
अक्षय कुमारनं इथं बंदोबस्त करत असलेल्या अधिकाऱ्यांचे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि म्हटलं, "येथे सर्वांची काळजी घेतल्याबद्दल मी सर्व अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी सर्व भाविकांची सुरक्षितता याची नीट व्यवस्थाै करण्यात आली आहे."