मुंबई Aishwarya Rai Bachchan : 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावल्यानंतर बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुंबईत परतली आहे. आज 19 मे रोजी सकाळी मुंबई विमानतळावरुन बाहेर येत असताना तिनं सुंदर किलर स्माईल देऊन सर्वांची मनं जिंकली. यावेळी ऐश्वर्यानं काळ्या-पांढरा रंगाचा ड्रेस परिधान केला. यात ती खूप देखणी दिसत होती. याशिवाय दुसरीकडं आराध्यानं पांढऱ्या रंगाचं स्वेटशर्ट आणि निळी पॅन्ट परिधान केली. यात ती सुंदर दिसत होती. विमानतळावर ऐश्वर्या आणि आराध्या यांनी पापाराझीला गोड अशी स्माईल दिली. आता सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
कान फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्याचं लूक : ऐश्वर्यानं कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या लूकनं तिच्या चाहत्यांना घायाळ केलं. काळ्या आणि सोनेरी रंगाच्या स्ट्रॅपलेस गाऊनपासून ते फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी डिझाइन केलेल्या निळ्या आणि चांदीच्या पोशाखापर्यंतचा ऐश्वर्याचा स्टायलिश लूक हा अनेकांना आवडला होता. कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्यानं 2002 मध्ये पदार्पण केलं होतं. ती कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'देवदास'च्या प्रीमियरसाठी शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर गेली होती. तेव्हापासून, ऐश्वर्या या कार्यक्रमाला हजेरी लावत आहे. तिला 'कान क्वीन' ही पदवी मिळली आहे.