मुंबई - Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चननं आज 19 मार्च रोजी वडील कृष्णराज राय यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याच्या वडिलांच निधन 19 मार्च 2017मध्ये झालं होतं. आता तिनं वडिलांच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केल्यानंतर ती चर्चेत आली आहे. या पोस्टवर तिनं लिहिलं, ''प्रिय बाबा आणि अज्जा, तुमच्यावर खूप प्रेम, तुमच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.'' आता शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोत ऐशबरोबर तिची आई ब्रिंदिया राय आणि मुलगी आराध्या बच्चन दिसत आहेत.
ऐश्वर्या रायनं शेअर केली पोस्ट : दुसऱ्या एका फोटोमध्ये ऐश्वच्या वडिलानं आपली नात आराध्याला कडेवर धरलेले दिसत आहेत. या फोटोवरून ऐश्वचं तिच्या कुटुंबावर खूप प्रेम असल्याचं दिसून येते. ऐश्व प्रत्येक वर्षी आपल्या वडीलांची आठवण करत पोस्ट शेअर करत असते. ऐश्व अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुसताच श्वेता बच्चननं 17 मार्च रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. श्वेतानं तिच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र या पार्टीमध्ये ऐश्वर्या राय, आराध्या आणि अभिषेक पोहचले नाहीत. याशिवाय ऐश्वनं श्वेताला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाही, त्यामुळे हा एक चर्चाचा विषय बनला.