मुंबई - अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे आगामी चित्रपटासह त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तयार झाला आहे. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स (YRF) निर्मित चित्रपटातून तो एका प्रेमकथेतून पदार्पण करेल. 'आशिकी 2', 'एक व्हिलेन' आणि 'मलंग' यांसारख्या चित्रपटासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक मोहित सुरी या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.
अहानच्या पदार्पणाची तयारी आदित्य चोप्राने काही काळापासून स्वतःच्या देखरेखीत केली आहे. यशराजनं त्याला त्याचे कौशल्य पणाला लावण्याची सर्वोत्तम संधी बहाल केलीय. इंडस्ट्रीच्या अंतर्गत माहितीनुसार, अहान पांडेचे हिंदी चित्रपटसृष्टीतील लॉन्चिंग एका तरुण अभिनेत्याचे अलिकडच्या वर्षांतील सर्वात आश्वासक पदार्पण मानलं जातंय. त्याला स्टार बनवण्याचा विडाच जणू यशराज बॅनरनं उचललाय.
यशराजच्या वतीनं अहानची ओळख मोहित सूरीशी करुन देण्यात आली आणि तो रोमँटिक नायिकाच्या भूमिकेसाठी योग्य वाटतो की नाही याचा शोध घेण्यात आला. मोहितच्या मार्गदर्शनाखाली, अहानने त्याच्या ऑडिशन आणि स्क्रीन टेस्टने सर्वांना प्रभावित केले आणि भूमिकेसाठी आवश्यक असलेले त्याने गुणदर्शन दाखवले. मोहित सूरी स्क्रीन प्रेझेन्ससह नवीन चेहऱ्यावर लक्ष्य केंद्रित करत, अहानला पडद्यावर एक उत्कृष्ट रोमँटिक नायक म्हणून सादर करण्यासाठी उत्सुक झालाय.