महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रतीक गांधी आणि दिव्येंदु शर्मा 'अग्नी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ

राहुल ढोलकियाचा 'अग्नी' चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज झाला आहे. हा चित्रपट अग्निशामकांच्या बलिदानावर प्रकाश टाकतो.

agni trailer out
'अग्नी' चित्रपटाचा ट्रेलर आऊट (Agni Trailer: Pratik Gandhi, Divyenndu Unite To Tackle Fires With Bravery And Resilience (Photo: Film Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : 9 hours ago

मुंबई: प्राइम व्हिडिओ आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या सहकार्यानं त्यांचा आगामी हिंदी चित्रपट 'अग्नी'चा ट्रेलर हा रिलीज करण्यात आला आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता राहुल ढोलकिया यांनी केलंय. या चित्रपटामध्ये प्रतीक गांधी आणि दिव्येंदु शर्मा हे दोन्ही स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सई ताम्हणकर, सैयामी खेर, उदित अरोरा, जितेंद्र जोशी,आणि कबीर शाह हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा प्रीमियर 6 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर होईल. हा चित्रपट जगभरातील 240 हून अधिक देशात पाहाता येईल.

'अग्नी'चा ट्रेलर रिलीज : 'अग्नी' चित्रपटामध्ये प्रतिक गांधी हा विठ्ठल नावाच्या फायर-फाइटरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दिव्येंदु शर्मा हा एक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अग्निशमन जवानांच्या निर्भयता आणि बलिदानचे खूप चांगल्या पद्धतीनं वर्णन केलंय. दोन मिनिट , 42 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये विठ्ठल आणि समित यांच्या, मतभेद असल्याचे दाखवले गेले आहे. दोघांना मुंबईतील लागलेल्या आगीबद्दलचा तपास करायचा आहे. या तपासामध्ये दोघांना हातमिळवणी करण्यास भाग पाडले जाते. जसजसे वैयक्तिक संघर्ष व्यावसायिक आव्हानांशी टक्कर घेतात, तसतसे त्यांची काळाविरुद्धची स्पर्धा सुरू होऊन जाते.

'अग्नी' चित्रपटाबद्दल : निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी सांगितल, "आम्हाला असा चित्रपट सादर करताना अत्यंत अभिमान वाटत आहे, अग्निशमन दलाच्या जवानांच्या धैर्याला सलाम करत असून आपल्या समाजाच्या सेवेत आणि सुरक्षेत गुंतलेल्या त्यांच्यातील सखोल सहकार्यावर प्रकाश टाकतो.' प्रमुख अभिनेता प्रतीक गांधी यानं या चित्रपटाबद्दल म्हटलं, 'अग्नी हा केवळ चित्रपट नसून त्याला 'परिवर्तनात्मक अनुभव' असं मी संबोधित करतो. पुढं त्यानं म्हटलं, 'अग्निशामक दलाच्या आव्हानांचा अभ्यास करणे हा एक सन्मान आहे. मानवी लवचिकतेची ही कथा प्रेक्षकांना अनुभवण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही.' याशिवाय दिव्येंदूनं पोलिस अधिकारी म्हणून केलेल्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details