महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा: द रुल'चं शूटिंग आवरल्यानंतर रश्मिका मंदान्नानं दिले 'पुष्पा 3'चे संकेत, लिहिली भावनिक चिठ्ठी - RASHMIKA MANDANNA WRAP UP PUSHPA 2

'पुष्पा: द रुल'चे शूट पूर्ण केल्यानंतर रश्मिका मंदान्नाने प्रेक्षकांना 'पुष्पा 3' चे स्पष्ट संकेत दिलेत. तिनं एक भावनिक चिठ्ठीही लिहिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 27, 2024, 5:24 PM IST

मुंबई - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिनं पुष्पा: द रुल या बहुप्रतिक्षित सीक्वल चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यामध्ये ती श्रीवल्लीची व्यक्तिरेखा साकारत आहे. गेली पाच वर्ष रश्मिका 'पुष्पा' चित्रपटाच्या फ्रँचाइजीचं कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या टीमबरोबर शूटिंग करत आहे. तिच्या पाच वर्षांच्या प्रवासाच्या समारोपात करताना तिच्या भावना चिठ्ठीतून शेअर केल्या.

रश्मिकानं तिच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दिवासापर्यंत सतत बिझी राहिल्याची आठवण सांगताना तिनं शेवटच्या दिवसाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, शूटिंगचा शेवटचा दिवस आहे असे तिला वाटत नव्हतं. थकवा असूनही, रश्मिकानं दिवसभर झपाटून काम केलं, तिनं एक क्रेझी भन्नाट गाणं शूट केल्याचंही सांगितलं. याचा अनुभव चाहत्यांना काही दिवसातच मिळणार असल्याचं सांगितलं.

रश्मिका मंदान्ना ((Photo: Instagram))

रश्मिका मंदान्नाने पुष्पा: द रुलचे शूट रॅपिंग केल्यानंतर पुष्पा 3 चा दिला संकेत - गेल्या पाच वर्षांपासून पुष्पा चित्रपटाचा सेट हे तिचं 'घर' झालं असल्याचंही रश्मिका म्हणाली. "इंडस्ट्रीतल्या 7/8 वर्षांपैकी, या सेटवर मी घरासारखीच 5 वर्षे घालवली आहेत, मात्र दिवसाच्या अखेरीस हे काम पूर्ण होत असल्यामुळं दुःख झालं", असं ती म्हणाली. रश्मिका मंदान्नानं 'पुष्पा 3' चे संकेत देखील दिले आहेत. 'अजूनही खूप काम बाकी आहे', असे सांगून तिनं 'पुष्पा :द रुल' या चित्रपटानंतरही या फ्रँचाइजीचे नवं काम सुरू होत असल्याचं कळवलंय. पुष्पा तचित्रपटाचा प्रवास संपलेला नाही, असंही तिनं म्हटलंय. रश्मिकाच्या या भावनिक चिठ्ठीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन यांचा उल्लेख देखील दिसला. यांच्या बरोबर तिनं खूप काळ एकत्र काम केलं आहे.

5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'पुष्पा 2: द रुल'च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा' सिक्वेलचा पहिला भाग जिथं संपला होता तिथून या चित्रपटाचं कथानक सुरू होणार आहे, अल्लू अर्जुन पुन्हा एकदा लाल चंदन तस्कर 'पुष्पा राज'च्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. तर रश्मिका त्याच्या प्रेयसी श्रीवल्ली म्हणून परत येतं आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि मैत्री मूव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया निर्मित, 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात फहद फासिल देखील प्रमुख भूमिकेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details