महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामच्या मृत्यूनंतर कथित बॉयफ्रेंड चंद्रकांत उर्फ चंदूनं केली आत्महत्या - CHANDU DIES BY SUICIDE - CHANDU DIES BY SUICIDE

Telugu TV Actor Chandu Death : टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचा मृत्यू झाल्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी साऊथ इंडस्ट्रीतून येत आहे. पवित्राचा कथिल बॉयफ्रेंड चंद्रकांत उर्फ चंदूनं आत्महत्या केली आहे.

Telugu TV Actor Chandu Death
तेलुगू स्टार चंदूचा मृत्यू ((pavithra jayram instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 2:07 PM IST

मुंबई - Telugu TV Actor Chandu Death :टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामच्या निधनानंतर पाच दिवसांनी साऊथ टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. साऊथ अभिनेता चंद्रकांत उर्फ चंदू हा त्याच्या मनीकोंडा येथील घरी संशयास्पद मृतावस्थेत आढळून आला. त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. चंदूच्या आकस्मिक निधनानं त्याच्या चाहत्यांना आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. चंदू हा त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध होता. टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत त्याचा समावेश होत होता. इतकंच नाही तर साऊथमध्ये त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

पवित्रा जयरामच्या मृत्यूनंतर केली आत्महत्या :याआधी चंदूची कथित गर्लफ्रेंड त्याची सहकलाकार पवित्रा जयरामचा कार अपघातात मृत्यू झाला. यानंतर काही दिवसांनी चंदूनं आत्महत्या केली. रंगारेड्डी जिल्ह्यातील नरसिम्हा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलकापूर येथे, चंद्रकांतचा त्याच्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर आता तेथील वातावरण चिंताजनक झाले आहे. एका रिपोर्टनुसार चंदूला वारंवार फोन करूनही प्रतिसाद दिला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. यानंतर पोलिसांना त्याच्याजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पवित्रा जयरामचा मृत्यू झाल्यानंतर चंदूनं तिला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली होती.

पवित्रा जयराम आणि चंदूनं केलं होतं एकत्र काम : आता चंदूच्या आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसला असून सोशल मीडियावर सर्वजण त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक साऊथ चित्रपटसृष्टीतील लोक त्याची आठवण करत त्याचे जुने काही व्हिडिओ शेअर करत आहेत. इतका चांगला अभिनेता कमी वयात गेल्यानंतर अनेकजण आता शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान पवित्रानं तेलुगू शो 'त्रिनयणी'मध्ये तिलोत्तमाची भूमिका साकारली होती. ही भूमिका अनेकांना आवडली होती. तर चंदूनं तिचा पती विशालची भूमिका साकारून अनेकांचे मनं जिंकली होते. याशिवाय त्यानं 'जोकली', 'राधा रमन', 'नीली' इत्यादी शोमध्येही काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. एक्स पती रितेश कुमारनं राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीबाबत केला धक्कादायक खुलासा - Rakhi Sawant
  2. कान्सच्या रेड कार्पेट पदार्पण करण्यापूर्वी थाय हाय स्लिट गाऊनमध्ये झळकली कियारा अडवाणी - Cannes Film Festival 2024
  3. कान्सच्या रेड कार्पेट पदार्पण करण्यापूर्वी थाय हाय स्लिट गाऊनमध्ये झळकली कियारा अडवाणी - Cannes Film Festival 2024

ABOUT THE AUTHOR

...view details