महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर अमुलची क्रिएटिव्ह पोस्ट, परिणीतीनंही दिली दाद - Amar Singh Chamkila - AMAR SINGH CHAMKILA

Amar Singh Chamkila : नेटफ्लिक्सवर नुकत्याच रिलीज झालेला अमरसिंग चमकीला चित्रपटावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रसिद्ध डेअरी ब्रँड अमूल इंडियाने चित्रपटाच्या पोस्टरसह पंजाबी गायका चमकीलाला श्रद्धांजली वाहिली आहे. परिणीतीने हा सन्मान तिच्या सोशल मीडियावर पुन्हा शेअर करत प्रतिक्रिया दिली.

Amar Singh Chamkila
अमर सिंग चमकीला

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 4:45 PM IST

मुंबई- Amar Singh Chamkila : दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला 'अमर सिंग चमकीला' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यापासून हा म्युझिकल ड्रामा चित्रपट त्यातील कथानक, भावनिक प्रसंग, ताल धरायला लावणारं संगीत आणि सिनेमॅटिक अनुभव देणारे सीन्स यामुळे लक्ष वेधून घेत आहे. प्रेक्षक या चित्रपटावर भरभरून कौतुक करताना दिसतात. यात मुख्य भूमिकेतील अभिनेता दिलजीत आणि परिणीती यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला जात आहे. दरम्यान, लोकप्रिय डेअरी कंपनी अमूल इंडियाने एका क्रिएटिव्ह पोस्टरद्वारे या चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

अमर सिंग चमकीला अमुलची क्रिएटिव्ह पोस्ट

अमूल इंडियानं नुकतीच इंस्टाग्रामवर एक अ‍ॅनिमेटेड फोटो पोस्ट केली आहे ज्यात परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ यांनी अमर सिंग चमकीला या चित्रपटात साकारलेल्या पात्रांमध्ये दाखवलं आहे. या जोडीला लाइव्ह परफॉर्म करताना, बटर-टॉप केलेले ब्रेड स्लाइस धरून आणि मायक्रोफोनमध्ये क्रून करताना आपण पाहू शकतो. पोस्टरवर ‘एक चमच खिला, अमूल पंजाब दा बट्टर’ असे लिहिले आहे.

पोस्टर शेअर करताना, ब्रँडने "अमुल टॉपिकल: दिलजीत दोसांझ इम्तियाज अली आणि एआर रहमान यांचा हिट म्युझिकल ड्रामा, अमर सिंग चमकीला" असं कॅप्शन दिलं आहे! उल्लेखाने नम्र होऊन, परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी विभागात दोन हृदयाच्या आकाराच्या इमोजीसह पोस्टर शेअर केले.

सुप्रसिद्ध पंजाबी कलाकार 'अमर सिंग चमकीला' यांचे जीवन त्याच्या नावाच्या चित्रपटात उजळले आहे. 1980 च्या दशकातील लाइव्ह परफॉर्मन्स आणि रेकॉर्ड तोडणाऱ्या संगीतासाठी चमकीला प्रसिद्ध होता. सेलिब्रिटी आणि चाहते इम्तियाज अलीच्या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अलीकडेच, कार्तिक आर्यन, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांनी चित्रपट पाहिल्यानंतर समीक्षण केलंय.

अभिनेता दिलजीत दोसांझने चमकीला ही व्यक्तीरेखा साकारली आहे. त्याकाळात एक संगीतकार म्हणून त्याच्या विक्रमी कॅसेट्स विकल्या जात होत्या. त्यानं 1980 च्या दशकात आपल्या संगीताचा वापर करून स्वत:ला गरिबीतून जागतिक ओळख मिळवून दिली होती. त्याची लोकप्रियता भारताबाहेरही प्रचंड होती. कॅनडा, यूएईसारख्या देशातून त्याचे कार्यक्रम हाऊसफुल्ल होत होते. यामध्ये परिणीतीने अमर सिंह चमकीला यांच्या पत्नी अमरजोत कौरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर उपलब्ध करण्यात आला होता.

इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली 'अमरसिंग चमकीला' या पंजाबच्या पहिल्या मास-मार्केट रॉक स्टारची सत्यकथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. 1980 च्या दशकात अतिशय सामान्य कुटुंबातील पंजाबी मुलगा संगीताच्या जोरावर लोकप्रियतेच्या कळसावर कसा पोहोचला, याकाळात त्याचे शत्रू कसे तयार होत गेले आणि वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याची हत्या का झाली याची कथा या चित्रपटात पाहायला मिळते.

हेही वाचा -

ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या 'फकिरा'ची शौर्यगाथा भाऊराव कऱ्हाडे आणणार रुपेरी पडद्यावर - Fakira movie launch

आमिर खाननं त्याच्या फेक व्हिडिओविरोधात एफआयआर केली दाखल, निवेदनही केलं जारी - Aamir Khan

रणवीर सिंगचा दिग्दर्शक ॲटलीबरोबरचा डान्स व्हिडिओ व्हायरल - ranveer singh

ABOUT THE AUTHOR

...view details