मुंबई - Aditi Rao Hydari and Siddharth: अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी 16 सप्टेंबर 2024 रोजी तेलंगणामध्ये दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धतीनं लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होते. आदिती आणि सिद्धार्थनं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांनी नवविवाहित जोडपं मुंबईत पोहोचलं. 'लव्हबर्ड्स' आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हातात हात घालून मुंबई विमानतळावर दिसले.
आदिती आणि सिद्धार्थचा व्हिडिओ व्हायरल : इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ मुंबई एअरपोर्टमधून बाहेर पडून कार पार्किंग एरियाकडे जाताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात धरलेला होता. आदितीनं यावेळी गुलाबी सूट परिधान केला होता, यावर ती खूपच सुंदर दिसत होती. एअरपोर्टसाठी तिनं नो मेकअप लूक निवडला. आदितीनं गुलाबी सूटवर कानात सुंदर झुमके, भांगात कुंकू लावलं असून यात ती आकर्षक दिसत होती. यावेळी सिद्धार्थ निळा डेनिम शर्ट आणि काळ्या ट्राउजरमध्ये दिसला. यावर त्यानं निळ्या रंगाची टोपी घातली होती. यावेळी सिद्धार्थनं विमानतळावर आपल्या चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर शेकहॅन्ड केलं.