महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'हीरामंडी' प्रीमियरमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH

Heeramand premiere : संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' वेब सीरीजचा प्रीमियर 24 एप्रिल रोजी झाला. या कार्यक्रमात अनेक स्टार्सनं हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकत्र दिसले.

Heeramand premiere
हीरामंडी प्रीमियर

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 10:28 AM IST

मुंबई - Heeramand premiere : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची आगामी वेब सीरीज 'हिरामंडी' ओटीटीवर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. या वेब सीरीजच्या रिलीजच्या एक आठवडा आधी निर्मात्यांनी मुंबईत प्रीमियरचे आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक स्टार्स उपस्थित राहिले. या प्रीमियर दरम्यान अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थवर अनेकांच्या नजरा होत्या. या जोडप्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. त्यामुळे दोघेही सध्या खूप चर्चेत आहे. प्रीमियरमध्ये नवविवाहित जोडपे पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा, अंकिता लोखंडे-विकी जैन, सुजैन खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्स्लन गोनी यांच्यासह अनेक स्टार कपल्स आपल्या स्टाईलिश अंदाजात दिसले.

'हिरामंडी'चा प्रीमियर :अदितीनं एक सुंदर निळ्या रंगाचा प्रिंटेड फ्लोरल अनारकली सूट परिधान केला होता. यावर तिनं मोकळे केस सोडले होते. याशिवाय तिनं हेवी इअररिंग्स घातले होते. दुसरीकडे सिद्धार्थ ब्लॅक रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. हे जोडपे स्क्रिनिंगच्या रेड कार्पेटवर हात धरून फोटोसाठी पोझ देत होते. सध्या आदिती आणि सिद्धार्थ त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगून आहेत. मात्र त्याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर अनेकदा होताना दिसतात. 2021 मध्ये या जोडप्यानं 'महा समुद्रम'मध्ये काम केलं होतं. यानंतर त्यांची या चित्रपटाच्या सेटवरून प्रेमकहाणी सुरू झाली. आदितीचं पहिलं लग्न अभिनेता सत्यदीप मिश्राबरोबर केलं होतं.

'हिरामंडी'नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित :आता अलीकडेच सत्यदीपनं फॅशन डिझायनर मसाबाबरोबर लग्न केलं आहे. याशिवाय सिद्धार्थनं देखील नोव्हेंबर 2003 मध्ये, मेघना नारायणबरोबर लग्न केलं होत. या जोडप्याचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांचा 2007मध्ये घटस्फोट झाला. 'हिरामंडी' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अदितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'गांधी टॉक्स' या मूकपटात दिसणार आहे. यात विजय सेतुपती आणि सिद्धार्थ जाधव असणार आहेत.

हेही वाचा :

  1. महानायक अमिताभ बच्चन लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित, पुरस्कार मिळताच म्हणाले... - Lata Mangeshkar Award
  2. गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर 19 हजार कोटींची कमाई, चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये साऊथ इंडियाचे प्रेक्षक आघाडीवर - Indian Box Office
  3. 'नाच गं घुमा' सिनेमातील स्त्री प्रत्येक घरातील स्त्रीचं प्रतिनिधित्व करते, मुक्ता बर्वेची प्रतिक्रिया - Mukta Barve

ABOUT THE AUTHOR

...view details