मुंबई - Adah Sharma :अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचं मुंबईतील घर सुनसान झालं होतं. 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा यात राहण्यासाठी येणार असल्याचा अनेकजण अंदाज लावत होते. यामुळे अदा काही दिवसांपासून खूप चर्चेत होती. आता अदा शर्मा सुशांतच्या घरी स्थायिक झाल्याची पुष्टी झाली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून अदा सुशांतच्या रिकाम्या घरात शिफ्ट झाली होती. एका मुलाखतीत अदानं सांगितलं की, तिला सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील घरी न राहण्याचा अनेकांनी सल्ला दिला होता. तिनं पुढं म्हटलं, "मी चार महिन्यापूर्वी येथे शिफ्ट झाली आहे, जेव्हा मी माझ्या कामातून मुक्त झाले तेव्हा मी येथे राहायला आले."
अदा शर्मानं घेतलं सुशांत सिंहचं घर भाड्यानं : यानंतर तिनं म्हटलं, "मी माझं संपूर्ण आयुष्य पाली हिलमधील एका घरात घालवलं होतं आणि मी पहिल्यांदाच तिथून बाहेर पडली आहे, येथे मला सकारात्मक व्हायब्स मिळतात, त्यामुळे मला एक घर हवं आहे. मला असं घर पाहिजे होतं जिथं निसर्ग मला आलिंगन देईल." अदा शर्मानं पाच वर्षांसाठी हे घर भाड्यानं घेतलं आहे. दरम्यान अदानं या घरात खूप पैसा गुंतवलाआहे. तिनं मंदिर बनवलं आहे. मंदिर खालच्या मजल्यावर आहे आणि ती वरच्या मजल्यावर राहणार आहे. एका रुममध्ये म्युझिक सिस्टम असेल, जिथे ती डान्स करेल. तिनं टेरेसला झाडं आणि वनस्पतींच्या हिरवळीनं सजवलं आहे.