मुंबई - Rubina dilaik:टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही अनेकदा तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बऱ्याचदा ती आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती रॅम्प वॉक करत असून तिचा अचानक तोल जातो, यानंतर ती तिच्या पायामधील हाय हिल्स काढून बाजूला टाकते आणि आत्मविश्वासानं रॅम्प वॉक करते. रुबिनानं खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःवर नियंत्रण ठेवले असून आता तिचे चाहते या कृतीमुळे कौतुक करत आहेत. रुबिनानं स्वतःला या ओप्स क्षणाचा बळी होण्यापासून वाचवले.
रुबिना दिलैकचं केलं यूजर्सनं कौतुक : रुबिना ही डिझायनर अर्चना कोचर यांच्या फॅशन शोची शोस्टॉपर होती. रुबीनाचा रॅम्प वॉक करतानाचा हा व्हिडिओ अर्चनानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ती अडखळली का? नाही, तिनं अद्भुत काम केले आहे.' रुबिना रॅम्प वॉक करत असताना अनवाणी पायांनी चालली. आता तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप चांगलं उदाहरण आहे, आत्मविश्वासाचे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'रुबिनाचा आत्मविश्वास खूप चांगला आहे.' आणखी एकानं लिहिलं, ' रुबिनानं खूप चांगल्या पद्धतीनं स्वत:ला नियंत्रित केलं.'