महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पायाला दुखापत असूनही रश्मिका मंदान्नानं मुंबईत 'छावा'च्या ट्रेलर लॉन्चला लावली हजेरी, व्हिडिओ व्हायरल - RASHMIKA MANDANNA LEG INJURY

विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला रश्मिका मंदान्ना पायाला दुखापत असूनही उपस्थित होती. आता तिचा या कार्यक्रमामधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना (रश्मिका मंदान्ना (instagram - Rashmika Mandanna))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 23, 2025, 10:33 AM IST

Updated : Jan 23, 2025, 11:17 AM IST

मुंबई -साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं आता बॉलिवूडमध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' नंतर, ती विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. काल, 22 जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी रश्मिका हैदराबादहून मुंबईला आली होती. रश्मिकाच्या पायला दुखापत झाली आहे, त्यामुळे तिथे व्हीलचेअर दिसली. तसंच या कार्यक्रमात ती स्टेजवर चढताना उड्या मारताना देखील दिसली. यानंतर विकी कौशलनं तिला साथ दिली आणि तिचा हात पकडला.

रश्मिका मंदान्ना झाली ट्रोल :रश्मिका मंदान्नाला ट्रेलर लॉन्चच्या वेळी अनेकांनी उभं राहण्यासाठी आधार दिला होता. आता स्टेजवर येण्यास मदत करताना विकी आणि रश्मिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी रश्मिकानं लाल आणि सोनेरी रंगाचा जाड सूट परिधान केला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. मात्र स्टेजवर चढताना तिला खूप संघर्ष करावा लागला. आता सोशल मीडियावर अनेकजण रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'जर तिला इतके वेदना होत असतील तर ती का आली?' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'बाई व्हीलचेअरचा वापर करायला पाहिजे.' आणखी एकानं लिहिलं, 'ओव्हर अ‍ॅक्टिंग करत आहे.' याशिवाय अनेकजण रश्मिकाला पाठिंबा देत तिला लवकर बरी होशील असं म्हणताना दिसत आहेत. तसेच काहीजण विकीचे देखील कौतुक करताना दिसत आहेत.

'छावा' चित्रपट : या चित्रपटात रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाई भोसले यांची मुख्य भूमिका साकारत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदान्नानं सोशल मीडियावर तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं होतं. जिममध्ये व्यायाम करताना तिच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला 'सिकंदर' चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलावे लागले. सध्या ती बरी होत आहे आणि 'छावा'च्या प्रमोशनमध्ये सहभागी होत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ...
  2. 'महाराणी येसूबाईं'च्या भूमिकेतील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, 'छावा'च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू
  3. रश्मिका मंदान्नाची अनोखी हॅट्रिक, ठरली IMDb च्या यादीतील एकमेव अभिनेत्री
Last Updated : Jan 23, 2025, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details