महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बलात्कार प्रकरणी मुंबईची अभिनेत्री पोहोचली विजयवाड्यात, जाणून घ्या काय आहे प्रकरण - ACTRESS RAPE CASE

controversial rape case - मुंबई चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री बलात्कार प्रकरणात पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी विजयवाडा येथे आली आहे. ती या प्रकरणाशी संबंधित काही तपशील आणि पुरावे विजयवाडा पोलिसांना देण्याची शक्यता आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत मल्याळम चित्रपटामध्ये काम करण्यासाठी लैंगिक शोषणाचं प्रकरण तापलं असताना हे प्रकरणही गाजत आहे.

एका सामाजिक उपक्रमात संबंधित अभिनेत्री आणि इतर
एका सामाजिक उपक्रमात संबंधित अभिनेत्री आणि इतर (ETV Bharat File photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 7:21 PM IST

Updated : Aug 30, 2024, 7:36 PM IST

हैदराबाद controversial rape case : मुंबईतील एक प्रतिथयश अभिनेत्री बलात्कार प्रकरणी विजयवाडा येथे पोहोचली आहे. पोलिसांना जबाब देण्यासाठी तिला विजयवाडा येथे यावं लागलं. ती पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी एसीपी श्रवंती राय यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. हे पथक या प्रकरणाची माहिती अभिनेत्रीकडून घेणार आहे. दुसरीकडे, मुंबईतील या अभिनेत्रीवर नोंदवलेल्या खोटारडेपणाच्या गुन्ह्याचीही चौकशी तपास अधिकारी करणार आहेत.

सरकारने या प्रकरणात तथ्य शोधण्यासाठी एसीपी श्रवंती राय यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम आधीच स्थापन केली आहे. तपास अधिकारी श्रवंती राय मुंबईतील अभिनेत्रीची चौकशी करणार आहेत. तसंच दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची चौकशी तपास अधिकारी करणार आहेत. या प्रकरणात आयपीएसचाही हात असल्याचा आरोप झाल्याची माहिती आहे. तपास अधिकारी श्रवंती रॉय यांचं पीडितेशी आधीच बोलणं झालं आहे.

दरम्यान, मुंबईतील चित्रपट अभिनेत्रीच्या विनयभंगाचं प्रकरण दिवसेंदिवस जोर धरत आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक घटकाची चौकशी केली जाईल. याबाबत पोलीस आधीच तपशील गोळा करत आहेत. तपासाचा भाग म्हणून गरज पडल्यास पोलिसांचं पथकही मुंबईला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण - जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात वायएसआरसीपी नेते आणि काही आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका अभिनेत्रीचा छळ केल्याप्रकरणी नवीन गोष्टी समोर येत आहेत. जेएसडब्ल्यू कंपनीचे चेअरमन सज्जन जिंदाल यांच्याविरुद्ध मुंबईत दाखल झालेल्या बलात्काराचा खटला निकाली काढता यावा म्हणून विजयवाडा येथे अभिनेत्री आणि तिच्या पालकांविरुद्ध बेकायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी टीका होत आहे.

विजयवाडा सीपी कांती राणा ताथा आणि डीसीपी विशाल गुन्नी यांनी तत्कालीन सरकारी नेत्यांच्या आदेशावरून आपल्या पदाचा गैरवापर करून हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडित महिला आणि तिच्या पालकांना धमकावून गप्प करण्यात आलं. त्यांच्या अटी मान्य केल्यानंतर अभिनेत्रीला जामिनावर बाहेर काढण्यात आल्याचं तपासात दिसून आलं आहे.

काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशनमध्ये सज्जन जिंदालने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने तिने न्यायालयात धाव घेतली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सज्जन जिंदालवर बलात्कार, महिलांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणे, गुन्हेगारी धमकी देणे आदी आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली होती. एका अभिनेत्रीनं उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन सज्जन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र ही तक्रार खोटी असल्याचा अहवाल यावर्षी मार्च महिन्यात मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये, कृष्णा जिल्हा वायएसआरसीपी नेते कुक्कला विद्यासागर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजयवाडा आयुक्तालयातील इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्यात अभिनेत्री आणि तिच्या पालकांविरुद्ध फसवणूक आणि खोटारडेपणाचा गुन्हा दाखल केला. डीसीपी विशाल गुन्नी, एडीसीपी रमणमूर्ती, एसीपी हनुमंत राव, सीआय श्रीधर, एसएसआय शरीफ आणि इतरांच्या पथकाने विमानाने मुंबईला जाऊन तिला अटक केली होती. आता हे प्रकरण आंध्रप्रदेशातील सरकार बदलल्यानंतर पुन्हा पुढे आलं आहे. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

  1. Rape Case On Sajjan Jindal: 'उद्योगपती सज्जन जिंदाल बलात्कार प्रकरण खोटं'; मुंबई पोलिसांकडून न्यायालयात 'क्लोजर रिपोर्ट' सादर
Last Updated : Aug 30, 2024, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details