महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या नारकरनं पती अविनाशला ट्रोल करणाऱ्याला दिलं सनसनीत उत्तर, वाचा बातमी सविस्तर - AVINASH NARKAR

ऐश्वर्या नारकरच्या पतीला सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर तिनं एका यूजरला चांगलेचं उत्तर दिलं आहे.

aishwarya narkar
ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 23, 2024, 1:18 PM IST

मुंबई :मराठी कलाविश्वातील सुंदर जोडी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे नेहमीचं त्याच्या रील्समुळे चर्चेत असतात. या जोडप्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेकदा दोघेही आपल्या चाहत्यांबरोबर इंस्टाग्राम लाईव्हद्वारे संवाद साधत असतात. या दोघांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती. यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. काही काळानंतर या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्यानं 1995मध्ये लग्न करून त्याच्या चाहत्यांना चकित केलं होतं. विवाहाच्या 29च्या नंतर देखील या जोडप्यामध्ये खूप प्रेम पाहायला मिळते.

पतीला ट्रोल केल्यानंतर ऐश्वर्या नारकरनं ट्रोल करणाऱ्याला दिलंउत्तर : ऐश्वर्या नारकरांच्या एका व्हिडीओवर युजरनं, 'ते शिमग्यातलं सोंग कुठे आहे' अशी कमेंट केली होती. ऐश्वर्या ही अनेकदा आपल्या पतीबरोबर डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अविनाश नारकर नसल्यानं युजरनं उद्धत पद्धतीनं असा प्रश्न विचारल्यानंतर तिला खूप राग आला. यानंतर तिनं या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत इन्स्टाग्रामवर ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. यात तिनं लिहिलं 'स्वत:ची लायकी सिद्ध करताय का? भोसले नावाचं काहीतरी कर्तृत्व असूद्या!'

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांचे डान्स व्हिडिओ लोकप्रिय : ऐश्वर्या नारकरनं अशी कमेंट करत या नेटकऱ्याला चांगलच सुनावलं आहे. यूजरला त्याच्या भाषेत चांगलेचं उत्तर दिल्यानंतर ती आता प्रसिद्धीझोतात आली आहे. हे जोडपे सुंदर डान्स व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचं नेहमीच सोशल मीडियावर मनोरंजन करत असतात. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या एनर्जीचं चाहते भरभरून कौतुक करतात. या वयात देखील त्यांनी त्यांची फिटनेस चांगली जपला आहे. दररोज सकाळी नारकर जोडपे योगा करतात, त्याचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत असतात. दरम्यान, ऐश्वर्या नारकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ती सध्या 'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details