मुंबई :'ट्वेल्थ फेल' अभिनेता विक्रांत मॅसी सध्या त्याच्या आगामी 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'द साबरमती रिपोर्ट' 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. याआधी या चित्रपटातील मुख्य अभिनेता विक्रांतनं एक मोठे वक्तव्य केलंय. 'साबरमती रिपोर्ट' हा 2002च्या गोध्रा घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमचा मोठा वाद झाला होता. आता विक्रांतनं मुस्लीम समाजाबाबत असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. नुकत्याच एका मुलाखतीत विक्रांतनं म्हटलं," ज्या गोष्टी मला निरुपयोगी वाटत होत्या, माझ्या मते त्या खरोखर निरुपयोगी नाहीत. लोक म्हणतात, हिंदू आणि मुस्लिम धोक्यात आहेत. पण मला नाही वाटत."
विक्रांत मॅसीचं वादग्रस्त विधान : पुढं त्यानं म्हटलं, "मुस्लिम धोक्यात आहेत, कोणाला धोका नाही, सर्व काही ठीक चालले आहे, भारत जगातील सर्वोत्तम ठिकाण आहे, युरोप, फ्रान्स, अमेरिकेत जा तुम्हाला कळेल तिथे काय चालले आहे. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, जिथे शांततेनं सर्व राहतात, भारत हे जगाचे भविष्य आहे. इथे डावी आणि उजवी विचारसरणी नाही. मला डावी विचारसरणी दिसत नाही. आपला वैयक्तिक अनुभव सांगताना, विक्रांतनं म्हटलं, माझे सासरे हिमाचलमधील एका लहान गावात राहतात, जिथून राष्ट्रीय महामार्ग 4 तासांच्या अंतरावर आहे, परंतु मी पाहतो की आता परिस्थिती बदलत आहे, होय, मी एक सन्माननीय स्टार आहे, भारत सरकारकडून मलाही शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, माझा चित्रपट सरकारी शाळेत दाखवले गेले होते, मी त्यांना ते दाखवायला सांगितले नव्हते, पण त्यांनी माझा चित्रपट शाळेतील मुलांना दाखवला, 'ट्वेल्थ फेल', यामुळे मी खूप आनंदी आहे'.