मुंबई -अंकुश चौधरी हा लोकप्रिय मराठी अभिनेत्यापैकी एक आहे. आजपर्यंत त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अंकुश चौधरीनं आपल्या करिअरची सुरुवात 1995मध्ये केली. अंकुशनं आपल्या जबरदस्त अभिनयानं मराठी सिनेसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आज आम्ही अंकुश चौधरीच्या काही लोकप्रिय पाच चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. हे चित्रपट पाहूण तुम्ही खूप स्वत:चे मनोरंजन करू शकता.
1 दुनियादारी :अंकुश चौधरी सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, उर्मिला कोठारे, रिचा परियाल स्टारर 'दुनियादारी' हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामधील 'टीक टीक वाजते डोक्यात' हे गाणं देखील खूप लोकप्रिय झालं होतं. 'दुनियादारी' चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं होतं. हा चित्रपट 2.5 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 32 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 19 जुलै 2013मध्ये प्रदर्शित झाला होता.
2 सावरखेड: एक गाव : राजीव पाटील दिग्दर्शित 'सावरखेड: एक गाव' हा चित्रपट एप्रिल 2004 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, संज्योत हर्डीकर, मकरंद अनासपुरे आणि बाकी इतर कलाकार दिसले होते. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटात सावरखेड हे एक आदर्श गाव आहे, जिथे लोक काही विरोधी विचार असूनही शांततेत एकत्र राहतात. मात्र एका आमदाराचा मुलगा राहुल परदेशातून परत आल्यानंतर तिथे काही विचित्र गोष्टी घडतात असं दाखविण्यात आलं आहे.