जयपूर : पिंक सिटी जयपूर हे नववर्ष सेलिब्रेशनचे डेस्टिनेशन व्हेन्यू बनले आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक जयपूरला आता पोहोचत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोमवारी कुटुंबासह जयपूरला गेला. यावेळी अक्षय कुमार नवीन वर्ष जयपूरमध्ये सेलिब्रेट करणार आहे. अक्षय कुमार जयपूरच्या दिल्ली रोडवरील आमेर भागातील हॉटेल लीला पॅलेसमध्ये राहणार असल्याचं समजत आहे. अक्षय हा आपल्या कुटुंबाबरोबर लीला पॅलेसमध्ये खास पद्धतीनं नवीन वर्ष साजरे करणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सोमवारी संध्याकाळी जयपूर विमानतळावर स्पॉट झाला. अक्षयला जयपूर विमानतळावर पाहिल्यानंतर तिथे मोठ्या संख्येनं चाहते जमले.
अक्षय कुमार करणार नवीन वर्ष पिंक सिटीमध्ये साजरे : विमानतळावरून बाहेर पडताना लोकांनी अक्षयचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपले. जयपूर विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था असताना अक्षय हा कारमध्ये बसला आणि हॉटेल लीला पॅलेसकडे रवाना झाला. नववर्षच्या सेलिब्रेशनसाठी अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांबरोबर दिल्ली रोडवरील हॉटेल लीला पॅलेसमध्ये थांबत आहे. या हॉटेलमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या कुटुंबासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. जयपूरमध्ये पर्यटकांची वर्दळ जास्त असल्यानं शहरातील हॉटेल्सही हाऊसफुल्ल आहेत. आता पिंक सिटीत सर्वच पर्यटन स्थळांवर, पर्यटकांची गर्दी होत आहे.