ETV Bharat / entertainment

महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांच्या 'देवमाणूस'मध्ये सुबोध भावेची एन्ट्री! - SUBODH BHAVE ENTRY IN DEVMANUS

महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांच्याबरोबर 'देवमाणूस' चित्रपटामध्ये सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे.

Subodh Bhave, Mahesh Manjrekar and Renuka Shahane
महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे (Instagaram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 4, 2025, 7:24 PM IST

मुंबई - सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित 'संगीत मानापमान' प्रदर्शनाच्या मार्गावर असून या सुप्रसिद्ध नाटकाच्या माध्यमांतराची प्रेक्षक आतुररेनं वाट पाहत आहेत. याआधी बालगंधर्व, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयक्षमतेनं प्रेक्षकांचं प्रेम मिळविलेले अभिनेता सुबोध भावे यांची आता महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांच्या 'देवमाणूस' मध्ये एन्ट्री झाली आहे. तेजस देऊस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा 'देवमाणूस' हा चित्रपट प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यमय अनुभव देईल. याआधी तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंगसह छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

'वास्तव', 'नटसम्राट' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन, 'वॉन्टेड', 'दबंग', 'रेडी', 'ओएमजी : ओ माय गॉड', 'जुनं फर्निचर' सारख्या चित्रपटातून अभिनय करणारे महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला आहे. तसेच रेणुका शहाणे यांनी 'हम आपके है कौन', 'अबोली', 'रिटा', 'दुसरी गोष्ट' सारख्या चित्रपटात अभिनय आणि रिटा, काजोल अभिनित 'त्रिभंग' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात सुबोध भावे यांच्या 'तुला पाहते रे', 'चंद्र आहे साक्षीला', 'तू भेटशी नव्याने' सारख्या मालिकांना प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळालं. हल्लीच 'वाळवी', 'फुलराणी', 'हॅशटॅग तदेव लग्न' सारखे त्यांचे चित्रपट गाजले. असे हे तीन दिग्गज कलाकार, महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे, 'देवमाणूस' या चित्रपटातून एकत्र आले आहेत ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

'देवमाणूस' या चित्रपटाबद्दल सुबोध भावे म्हणाले, “महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोन महान कलाकारांसोबत मी पूर्वी स्वतंत्रपणे काम केलं आहे. मात्र, देवमाणूसमध्ये त्यांच्याबरोबर पहिल्यांदा एकत्र काम करत आहे, याचा मला प्रचंड आनंद होत आहे. हा चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि प्रेक्षक आमच्या एकत्रित प्रयत्नांवर कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्याची खूप चित्रपटांचे आहे.”

'देवमाणूस' या चित्रपटाचे अन्य तपशील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.