महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खानला जीवे मारण्याच्या कटाबाबत उल्लेख केल्याप्रकरणी यूट्यूब चॅनलच्या इन्फ्लुएंसरला राजस्थानहून अटक - Salman Khan - SALMAN KHAN

Salman khan :'अरे छोड यार' या यूट्यूब चॅनलवर सलमान खान आणि बिश्नोई गँगबद्दल उल्लेख केल्याप्रकरणी राजस्थानहून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिस या प्रकरणी कसून चौकशी करत आहे.

Salman khan
सलमान खान (सलमान खान (सलमान खान (फाइल फोटो) (IANS)))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 3:50 PM IST

मुंबई - Salman khan : 'अरे छोड यार' या यूट्यूब चॅनलवर अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या कटाबाबत उल्लेख केल्याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 506(2), 504, 34 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 66(D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला राजस्थानहून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. आरोपीचं नाव बनवारीलाल लातुरलाल गुजर, वय 25 असं आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या व्यक्तीनं 'अरे छोडो यार' चॅनेलवरील यूट्यूब व्हिडिओद्वारे बिश्नोई गँगची चर्चा केली आणि सलमान खानला मारण्याच्या योजनांचा उल्लेख केला त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

सलमान खान (Etv Bharat)

दक्षिण सायबर पोलीस राजस्थानला रवाना : या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी एक पथक राजस्थानला रवाना झालं होतं. सायबर पोलिसांच्या पथकानं आरोपी बनवारीलाल लातुरलाल गुजरला राजस्थान राज्यातील बुंदी जिल्ह्यातील फाजलपुरा, हिंदोलीतील बोर्डा गावातून अटक केली. राजस्थानला गेलेले पोलिसांचे पथक आज दुपारी 2:15 वाजता आरोपीला घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सलमान खाननं केलं मुंबई पोलिसांचं कौतुक :अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान या दोघांचे देखील याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 4 जूनला जबाब नोंदवला. त्यावेळी सलमान खाननं त्याच्या जीवाला गंभीर धोका असल्याचं नमूद करत, मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केला आहेत. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला मुंबईत आणण्यासाठी मुंबई पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सलमान गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्नोईला मुंबई पोलीस साबरमती तुरुंगातून ताब्यात घेण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं याआधी दिली होती. याशिवाय याप्रकरणामधील एका आरोपीनं लॉकअपमध्ये आत्महत्या केली होती. या आरोपीचं नाव अनुज थापन होतं.

हेही वाचा :

  1. अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनचा मंदिरातील व्हिडिओ व्हायरल, यूजर्सनं केलं ट्रोल - Anikita Lokhande News
  2. राम चरण-उपासना कोनिडेनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना - ram charan upasana
  3. दिलजीत दोसांझनं प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये गायलं गाणं, प्रोमो रिलीज - Kalki 2898 AD First Song Promo out

ABOUT THE AUTHOR

...view details