मुंबई - 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' हे बॉलिवूडच्या दोन मोठ्या फ्रँचायझीचे चित्रपट या दिवाळीत एकत्र प्रदर्शित होणार आहेत. 'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर चित्रपट आहे. यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे, तर 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. काही चित्रपटगृहांमध्ये दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. चला जाणून घेऊया दोन्ही चित्रपटांची प्रिसेल उत्पन्न किती आहे.
प्रीसेलमध्ये आघाडीवर कोणता चित्रपट आहे? - इंडस्ट्री ट्रॅकर सकनील्कच्या मते, 'सिंघम अगेन'च्या एक दिवस आधी 'भूल भुलैया 3' ची प्री-सेल तिकीट विक्री सुरू झाली होती. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजेपर्यंत 34289 तिकिटे विकली गेली आहेत आणि एकूण 88.02 लाख रुपये कमावले आहेत. दरम्यान, 'सिंघम अगेन'चेही बुकिंग सुरू झाले असून, काही तासांतच 18.46 लाख रुपयांची 4901 तिकिटे विकली गेली आहेत. हे प्राथमिक आकडे ब्लॉक केलेल्या जागा आणि ट्रॅक केलेले शो दर्शवत आहेत.