मुंबई - 71st Miss World 2024 Finale :71वी मिस वर्ल्ड पेजेंट स्पर्धा 2024चा फिनाले आज म्हणजेच 9 मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. भारतात 28 वर्षांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होत आहे. हा क्षण देशासाठी अभिमानाचा आहे. दरम्यान फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सिनी शेट्टी भारताकडून मिस वर्ल्ड 2024 चे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस वर्ल्ड 2024 च्या अंतिम फेरीत सिनी शेट्टी व्यतिरिक्त काही भारतीय सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशननं नुकतीच काही भारतीय स्टार्सची नावे जाहीर केली आहेत, जे मिस वर्ल्ड स्पर्धा 2024 च्या फिनालेमध्ये दिसेल. आता मिस वर्ल्ड 2024 च्या फिनालेमध्ये कोणते सेलिब्रिटी आपली जादू दाखवणार याबद्दल जाणून घ्या.
करण जोहर : लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर मिस वर्ल्ड 2024 च्या फिनालेमध्ये दिसणार आहे. करण मिस वर्ल्ड कॉन्टेस्ट 2024चा फिनाले होस्ट करणार असल्याचं समजत आहे. यापूर्वी देखील करणनं अनेक शो होस्ट केले आहेत.
मीगन यंग : मिस वर्ल्ड 2013 मीगन यंग (फिलीपिन्स) करण जोहरसह 2024 मध्ये 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धा होस्ट करेल. मिस वर्ल्ड 2024च्या फिनालेसाठी अनेकजण उत्सुक आहेत.
नेहा आणि टोनी कक्कर : बहीण-भावाची हिट सिंगिंग जोडी नेहा कक्कर आणि टोनी कक्कर मिस वर्ल्ड स्पर्धा 2024 च्या अंतिम फेरीत आपली जादू दाखवताना दिसणार आहे. टोनी आणि नेहा त्यांच्या गाण्यांनी आणि नृत्यानं या जागतिक स्पर्धेत धमाक करणार आहे.
शान :नेहा आणि टोनी कक्करबरोबर, गायक शान देखील 71 व्या मिस वर्ल्ड पेजेंट 2024 च्या अंतिम फेरीत गाणं गाईल.
रजत शर्मा :इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2024 च्या अंतिम फेरीत ज्युरीमध्ये असणार आहे. सोशल मीडियावर रजत शर्मानं एक पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितलं आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ''71व्या मिस वर्ल्ड फिनालेमध्ये ग्लॅमर आणि उत्साहाच्या संध्याकाळी माझ्याबरोबर सामील व्हा, यावेळी मी भारतात होणाऱ्या या स्पर्धेत परीक्षक आहे, हा खास क्षण चुकवू नका. 9 मार्च रोजी सोनी लिव्हवर थेट प्रक्षेपण या कार्यक्रमाचं केलं जाईल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता आणि लंडनच्या टाइम झोननुसार दुपारी 2 वाजता थेट पाहता येईल.'' रजत शर्माच्या या पोस्ट आता अनेकजण प्रतिक्रिया देऊन कार्यक्रमाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत.
हेही वाचा :
- अजय देवगण आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान'ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई
- शाहरुखने पहिल्यांदाच लेक सुहाना खानसह शेअर केली स्क्रिन स्पेस
- राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीनं केलं 'बिग बॉस 12' फेम सोमी खानबरोबर गुपचूप निकाह