महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

"अर्थसंकल्पातून आमच्या पदरी निराशाच, अर्थसंकल्पाचे आम्ही..." अर्थसंकल्पावर सर्वसामान्य म्हणतात... - UNION BUDGET 2025

अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळाले? गोरगरिबांच्या पदरी निराशाच आलीय. करात मोठी सूट देण्यात आल्यामुळं आम्ही या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशा संमिश्र प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर सर्वसामान्यांनी दिल्यात.

Union Finance Minister Nirmala Sitharaman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 4:35 PM IST

मुंबई-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (शनिवारी) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. तब्बल आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रातील घटकांसाठी मोठमोठी तरतूद करण्यात आलीय. तर मध्यमवर्गीय आणि नोकरदारवर्गाला दिलासादायक म्हणजे कर प्रणालीत सूट देण्यात आलीय. 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. पण दुसरीकडे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळाले? गोरगरिबांच्या पदरी निराशाच आलीय. तर करात मोठी सूट देण्यात आल्यामुळं आम्ही या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशा संमिश्र प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर सामान्य लोकांनी दिल्यात.

बजेट केवळ श्रीमंत लोकांसाठीच :एकीकडे करामध्ये सूट देण्यात आलीय. 12 लाखांपर्यंत ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी घोषणा केलीय. पण मुंबईत, महाराष्ट्रात किंवा देशात जो गरीब राहतो, त्यांचे वर्षाला 12 लाख उत्पन्न होते का? असा सवाल सामान्य लोकांनी उपस्थित केलाय. जे श्रीमंत लोक आहेत त्यांचे 12 लाखांपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असते. कर प्रणालीचा फायदा हा श्रीमंत लोकांना झालाय. त्यामुळे अर्थसंकल्पात गोरगरिबांसाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही किंवा कोणतीही मोठी घोषणा नाही, कोणताही दिलासादायक निर्णय नाही. म्हणून गोरगरिबांची भ्रमनिराशा झाली असून, आमच्या पदरी घोर निराशाच पडलीय. हा अर्थसंकल्प केवळ श्रीमंत लोकांसाठीच होता, अशा संतप्त प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर सामान्य लोकांनी दिल्यात.

एकीकडे द्यायचे दुसरीकडे घ्यायचे...:अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी देशातील महागाई कमी होण्याची चिन्हे नाहीत. गॅसचे दर, पेट्रोल, डिझेल, आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होत नाहीत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत सामान्य नागरिकांनी आणि गरिबांनी जगायचे कसे? हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. पण करप्रणालीत सूट दिली म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून घ्यायचे असा हा प्रकार सुरू आहे, असेही या अर्थसंकल्पावरती सामान्य लोकांनी म्हटलंय.

पैसे बचतीस मदत होणार : एकीकडे अर्थसंकल्पावर सामान्य लोकांनी टीका केल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे काही लोकांनी अर्थसंकल्पाचे स्वागतही केलंय. आम्ही अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. कारण मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा म्हणजे 12 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यामुळे जशी महागाई वाढली तसे तुमचे उत्पन्नही वाढलंय. म्हणून या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करतो. अर्थसंकल्पातून आम्हाला मोठे गिफ्ट मिळालंय. करात बदल करून अर्थमंत्र्यांनी गूड न्यूज दिलीय. 12 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यामुळं आमचे पैसे सेव्हिंग्ज होण्यास मदत होईल, अशा संमिश्र प्रतिक्रिया सामान्य लोकांनी दिल्यात.

हेही वाचा-

  1. केंद्रीय बजेटमधून सर्वसामान्य लोकांच्या काय आहेत अपेक्षा? जाणून घ्या...
  2. देशाचा आर्थिक पाहणी अहवाल; जीडीपी वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details