नवी दिल्ली Budget 2024 Announcements for Agri Sector : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (23 जुलै) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. यामध्ये कृषी क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार आणि कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, ऊर्जा संरक्षण, शहरी विकास, पायाभूत संरचना, संशोधन विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे. तसंच मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या 'या' घोषणा : "या वर्षी शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल," असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. याशिवाय 400 जिल्ह्यांमध्ये डिजिटल खरीप पीक सर्वेक्षण केलं जाणार आहे. तर 10 हजार बायो संशोधन केंद्रही बांधली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.