नवी दिल्ली India Budget 2024 :मोदी 3.0 सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज (23 जुलै) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यात विविध क्षेत्रांसाठी सरकारनं अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात सरकारनं अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी दर कमी केले आहेत. त्यात प्रामुख्यानं कॅन्सरच्या औषधांवरील शुल्क मुक्त करण्यात आलेत. तसंच 25 आवश्यक खनिजांवरील सीमा शुल्क हटवण्यात आले आहेत.
'या' गोष्टी होणार स्वस्त :
- सोनं, चांदी, प्लॅटिनम
- मोबाईलचे सुट्टे पार्ट्स
- 15 बंदरांमध्ये उत्पादन होणाऱ्या माशांपासूनच्या उत्पादनांवरील करात सवलत
- इम्पोर्टेड दागिने
- एक्स-रे मशिन
- चामडी बूट, चप्पल
- तांब्यापासून बनविलेल्या वस्तू
- इलेक्ट्रिक वाहनं
- कॅन्सरवरची औषधं
- लिथियम बॅटरी
- पीवीसी फ्लेक्स बॅनर