महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टोयोटा किर्लोस्कर मोटरला संभाजीनगरमध्ये 827 एकर जमीन मंजूर, 26 हजार रोजगार निर्मिती - TOYOTA KIRLOSKAR

Toyota Kirloskar : महाराष्ट्र सरकारनं 'टोयोटा किर्लोस्कर मोटर'ला (Toyota Kirloskar Motor Company) छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन उत्पादन युनिटसाठी 827 एकर जमीन दिली आहे.

Toyota Kirloskar
टोयोटा मोटर (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 9, 2024, 11:00 AM IST

मुंबईToyota Kirloskar :टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीला छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य सरकारनं इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार तयार करण्यासाठी 827 एकर जमीन हस्तांतरीत केलीय. हा ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पात 21 हजार कोटी गुंतवणूक होणार आहे. हा प्लांट जानेवारी 2026 पर्यंत उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळं 26 हजार रोजगार निर्माण होणार आहे.

प्रकल्पासाठी 827 एकर जमीन :एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "टोयोटा किर्लोस्कर मोटरला (Toyota Kirloskar Motor) सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन उत्पादन प्रकल्पासाठी 827 एकर जमीन देण्यात आलीय. 31 जुलै रोजी, कंपनीनं इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारसाठी ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारसोबत करार केला होता".

स्मार्ट औद्योगिक शहर : "महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (MITL) तसंच महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त भागीदारीत ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहराची स्थापना करण्यात आलीय. छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा, बिडकीनमध्ये हा प्रकल्प विकसित केला जात आहेत," असं दिल्ली -मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अधिकाऱ्यानं सांगितलं.

"या प्रकल्पानं गुंतवणूक आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या बिडकीनमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor)प्रायव्हेट लिमिटेडला 827 एकर जमीन देण्यात आली आहे".-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अधिकारी

2026 पासून उत्पादन सुरू : "टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी(Toyota Kirloskar Motor) या उत्पादन प्लांटसाठी 21 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. काम लवकरच सुरू होणार आहे. जानेवारी 2026 पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळं 8,000 प्रत्यक्ष रोजगार आणि 18,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील," असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती :TKM सह करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून दरवर्षी 4 लाख इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार तयार करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळं ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती होईल.

हे वाचलंत का :

  1. व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर
  2. OnePlus 13मध्ये मिळणार iPhone 16 सारखे फीचर्स, Qi2 वायरलेस चार्जिंग
  3. दसऱ्यानिमित्त 'या' दुचाकीवर मिळतेय ६० हजारांची सुट, iPad जिंकण्याची संधी

ABOUT THE AUTHOR

...view details