मुंबई Stock Market Crash : जागतिक स्तरावरील घडामोडींचा फटका हा भारतीय शेयर बाजाराला बसत आहे. 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1500 अंकांच्या घसरणीसह 80,000 च्या खाली गेला, तर निफ्टी-50 देखील जवळपास 500 अंकांनी घसरली. या मोठ्या घसरणीत काही मिनिटांतच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास १० लाख कोटी रुपये बुडाले.
शेयर बाजारात 'ब्लॅक मंडे' : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (5 ऑगस्ट) शेअर बाजार घसरणीनंच उघडला. BSE सेन्सेक्स 1,310.47 अंक किंवा 1.62 टक्क्यांच्या घसरणीसह 79,671.48 वर उघडला, तर निफ्टी 404.40 अंक किंवा 1.64 टक्क्यांच्या घसरणीसह 24,313.30 वर उघडली. बाजार उघडल्यानंतर 2368 शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली, तर सुमारे 442 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. दोन्ही बाजार निर्देशांकातील ही सुरुवातीची घसरण काही मिनिटांत आणखी वाढली. सकाळी 9.20 वाजता सेन्सेक्स 1,585.81 अंकांनी किंवा 1.96% ने घसरून 79,396.14 च्या पातळीवर आला, तर निफ्टी 499.40 अंकांनी किंवा 2.02% ने घसरून 24,218.30 च्या पातळीवर आला.