नवी दिल्ली Sebi Bans Anil Ambani : : बाजार नियामक सेबीनं ( SEBI ) उद्योगपती अनिल अंबानींना मोठा धक्का दिला आहे. सेबीनं अनिल अंबानी यांच्यावर 5 वर्षासाठी रोखे बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. अनिल अंबानी यांच्यासह आणखी 24 संस्थांवरही सेबीनं लगाम लावला आहे. सेबीनं अनिल अंबानी यांना 25 कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे हा उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा धक्का मानलं जात आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून निधी वळवल्याबद्दल त्यांच्यावर रोखे बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांना व्यवहार करण्यास बंदी :बाजार नियामक सेबीनं उद्योगपती अनिल अंबानी यांना रोखे बाजारात व्यवहार करण्यास प्रतिबंधित करण्यात आलं आहे. त्यांच्यासह इतर 24 संस्थांना कंपनीकडून निधी वळवल्याबद्दल पाच वर्षांसाठी रोखे बाजारातून प्रतिबंधित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सेबीनं अनिल अंबानींना 25 कोटींचा दंड ठोठावला आहे. उद्योगपती अनिल अंबानीना कोणत्याही कंपनीमध्ये संचालक किंवा मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी (KMP) किंवा बाजार नियामकाकडं नोंदणीकृत सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित राहण्यापासून रोखण्यात आलं आहे. तब्बल 5 वर्ष अनिल अंबानी यांच्यावर ही बंदी राहणार आहे.