मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केले. आरबीआयकडून सलग दहाव्यांदा रेपो धोरण न बदला रेपो दर स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रेपो दर हा 6.5 टक्केच राहणार आहे. बँकेकडून देण्यात येणाऱ्या वाहन कर्ज, गृहकर्ज अशा विविध कर्जाचे दर कमी होणार नाहीत.
चालू आर्थिक वर्षातील चौथे द्वि-मासिक पतधोरण आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जाहीर केले. पतधोरण समितीनं (MPC) रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.फेब्रुवारी 2023 पासून रेपो दर हा 'जैसे थे' ठेवण्यात आला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हनं गेल्या महिन्यात बेंचमार्क दर 50 बेसिस पॉइंटने कमी केला. त्यानंतर आरबीआयकडून रेपो दरात कपात होईल, असा अंदाज करण्यात आला होता. मात्र, आरबीआयनं रेपो दरात कोणताही बदल केला नाही.