महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'आरबीआय'कडून नवं पतधोरण जाहीर; रेपो रेटमध्ये कोणाताही बदल नाही, UPI मर्यादा वाढली - RBI Repo Rate Unchanged - RBI REPO RATE UNCHANGED

RBI Repo Rate Unchanged : आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळीदेखील आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम असेल.

RBI
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 11:32 AM IST

Updated : Aug 8, 2024, 12:24 PM IST

नवी दिल्ली RBI Repo Rate Unchanged :भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम आहे.

काय म्हणाले शक्तिकांत दास? :शक्तिकांत दास यांनी रेपो रेटविषयक सविस्तर माहिती दिली. चलनविषक धोरण समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल करू नये, असे सुचवल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. आरबीआयने SDF 6.25%, MSF 6.75% तसेच रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शक्तिकांत दास यांनी जाहीर केलं.

  • Q1-7.2
  • Q2 - 7.2
  • Q3- 7.3

नवव्यांदा रेपो रेटमध्ये बदल नाही : RBI नं जूनमध्ये सलग आठव्यांदा रेपो दर 6.5 टक्क्यांवर ठेवला होता. त्यानंतर RBI ने आपला FY25 साठी GDP वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यांवर सुधारित केला, जो आधीच्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा वाढला. तसंच FY25 साठी महागाईचा अंदाज 4.5 टक्क्यांवर स्थिर राहिला. त्यानंतर आता नवव्यांदा RBI नं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही.

UPI मर्यादा वाढली :भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरण जाहीर केलं. दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय एमपीसीनं बेंचमार्क रेपो दर 6.5 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला. तसेच, UPI मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. सध्या, UPI व्यवहार मर्यादा 1 लाख रुपये होती. RBI ने UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा प्रति व्यवहार 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरणा नियमित करणे हा या वाढीचा उद्देश आहे, असं आरबीआयनं सांगितलं.

Last Updated : Aug 8, 2024, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details