हैदराबाद :स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कुणाल कामरा तसंच ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांच्यात X वर शाब्दिक चकमक झालीय. यावेळी भावीश अग्रवाल यांनी कुणाल कामरा यांना फ्लॉप कॉमेडियन म्हटलं आहे. त्याला उत्तर देताना कुणाल यांनीही अग्रवाल यांना 'ओलन मस्क' म्हणत त्यांची खरडपट्टी काढलीय. मात्र, नेमका त्यांच्यात कशावरून वाद झाला? जाणून घेऊया...
खराब सर्व्हिसिंगमुळं वाद : ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या खराब सर्व्हिसिंग नेटवर्कवर कमरा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. भारतातील लोक अशा प्रकारे ईव्हीचा वापर करतील का, असा प्रश्न त्यांनी X वर उपस्थित केला होता.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या खराब सर्व्हिसिंगबद्दल काही काळापासून ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत, असं अनेक ग्राहकांनी कामरा यांच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत घट होण्यामागं, हे देखील एक कारण असू शकतं असं बोललं जात आहे. सध्या सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
ओलाचा शेअर घसरले :अग्रवाल यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं त्यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. अनेक जणांनी त्यांच्या पोस्टवर टीका केलीय. ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्यामुळं कामरा यांनी मांडलेले मुद्दे बरोबल असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तसंच काही वापरकर्त्यांनी अग्रावाल याचं मत देखील म्हत्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
टू-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्माता ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर्स वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 8 टक्क्यांनी घसरले. ऑगस्टमध्ये बाजारात पदार्पण झाल्यापासून, कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. केवळ गेल्या महिन्यातच कंपनीचं मूल्य 20 टक्क्यांहून अधिक घसरलं होतं.
हे वाचलंत का :
- मोबाईलवरून काही मिनिटांत जाणून घ्या तुमचं PF बॅलन्स, तुमचं EPFO पासबुक कसं तपासायचं? - EPFO
- तुमचा फोन चोरीला गेल्यास आपोआप होणार लॉक, जाणून घ्या Google चं नविन फीचर्स - Theft Detection Lock
- एआय तंत्रज्ञान जगासाठी अणुबॉम्बइतकंच धोकादायक - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर - Artificial Intelligence