हैदराबाद- भारतीयांमध्ये अॅपलच्या मोबाईची चांगलीच क्रेझ आहे. अॅपलची चांगली विक्री झाल्यानंतर अॅपलचे सीईओ टीम कूक हे आनंदी झाले. त्यांनी प्रतिक्रिया देत कंपनीच्या भारतामधील गुंतवणुकीसह कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता क्षेत्रातील गुंतवणुकीची माहिती दिली.
अॅपलचे सीईओ टीम कूक म्हणाले, "आम्ही भारतामधील व्यवसायामध्ये वाढ अनुभवली आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. मार्चच्या तिमाहीत चांगल्या व्यवसायाची नोंद झाली. भारतामधील बाजारपेठ ही अतुलनीय आणि उत्साह वाढविणारी आहे. या बाजारपेठेवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहेत. व्यवसायाचा विस्तार, साखळी पुरवठा यासह उत्पादनदेखील वाढविणार आहोत. स्पर्धेत टिकण्याकरिता तुम्हाला तिथं अधिक उत्पादन करावं लागणार आहे." अॅपलनं आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर कंपनीचे सीईओ यांनी प्रतिक्रिया दिली.
आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद-पुढे कुक म्हणाले, " आम्ही भारतामध्ये विविध पातळीवर विस्तार करणार आहोत. तसेच डेव्हलपर यांच्यासाठीच्या इकोसिस्टिमवर काम करत आहोत. भारतात डेव्हलपवर आधारित खूप वेगानं प्रगती होत असल्याचं पाहून आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण इकोसिस्टिमवर काम करत आहोत. आम्ही बाराहून अधिक देशांसह विविध भागांमध्ये आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद केली. त्यामध्ये लॅटिन अमेरिकेतील तिमाहीच्या कामगिरीचा समावेश आहे. तसेच मध्य पूर्व, कॅनडा, भारत, स्पेन आणि तुर्की या देशांचाही समावेश आहे."
जगभरातील एकूण व्यवसायात घसरण-भारतामध्ये अॅपलच्या विक्रीत वाढ झाली असली तर जगभरातील एकूण विक्रीत 10 टक्के घसरण झाली आहे. मार्चच्या तिमाहीत कंपनीनं 45.96 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला. असे असले तरी वॉल स्ट्रीटवरील शेअर बाजारात कंपनीचे शेअर गुरुवारी 6हून अधिक टक्क्यांनी वधारले. चीननं सरकारी अधिकारी आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांना अॅपलचा वापर करण्यास बंदी घातली. त्याचा चीनला खूप मोठा आर्थिक फटका बसला.
एआय उत्पादनांसाठी कंपनीकडून लक्षणीय गुंतवणूक-कोरोना महामारीनंतर अॅपलच्या विक्रीत जगभरात घसरण झाली होती. त्यामुळे कंपनीला कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेवर नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी दबाव होता. गुंतवणुकदारांच्या अपेक्षेप्रमाणं कंपनीनं कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेसाठी ( AI) लक्षणीय गुंतवणूक केली. आम्ही परिवर्तनीय सामर्थ्य आणि आश्वासक असलेल्या कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतो. तसंच नव्या युगामध्ये बदल घडविण्यासाठी एआयकडून फायदे मिळणार असल्याचा विश्वास आहे. यापूर्वीच कंपनीनं गुगलमध्ये काम करणाऱ्या एआय क्षेत्रातील 12 हून अधिक तज्ज्ञांना नोकरी दिली आहे. त्यांच्या मदतीनं झुरीच येथं सेक्रिटिव्ह युरोपियन लॅबोरटरी सुरू केली आहे. या लॅबमधून नवीन एआय उत्पादने आणि मॉडेल विकसित करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-
- केंद्र सरकारनं 'द वॉशिंग्टन पोस्ट'चा 'तो' दावा फेटाळला, केंद्रीय मंत्री म्हणाले 'भयानक'
- Apple Phone Hacking Alert : आयफोनवर आलेल्या हॅकिंगच्या इशाऱ्याची होणार चौकशी, सरकारचे आदेश