महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जागतिक हवामान दिनानिमित्त 2024 ची जाणून घ्या थीम आणि महत्त्व - world meteorological day 2024

World Meteorological Day: आज 23 मार्च रोजी 'जागतिक हवामान दिवस' आहे. याचं महत्त्व आणि हा दिवस कधी पासून साजरा करण्यात आला हे जाणून घेण्यासाठी बातमी वाचा...

World Meteorological Day
जागतिक हवामान दिन

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 2:22 PM IST

मुंबई - World Meteorological Day: दरवर्षी 23 मार्च रोजी 'जागतिक हवामान दिवस' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना हवामानशास्त्र आणि त्यात सातत्यानं होत असलेल्या बदलांबद्दल जागरूक करणे हा आहे. जागतिक हवामान संघटना दरवर्षी वेगळ्या थीमसह हा दिवस साजरा करते. या वर्षी 2024 मध्ये जागतिक हवामान दिनाची थीम 'हवामान कृतीच्या अग्रभागी' आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) नं जागतिक हवामान दिनाची स्थापना केली. 23 मार्च 1950 रोजी हवामान आणि हवामान बदलांचा अंदाज लावण्यात मदत करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा घोषित करण्यात आला.

पृथ्वीच्या संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक: जागतिक हवामान दिवसाचे विशेष महत्व आहे. जागतिक हवामान संघटना, हवामान अंदाज आणि हवामान बदल कमी करण्याचा सतत प्रत्यन करताना दिसते. हवामान आणि हवामानाशी संबंधित माहितीच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा आणि या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी हा दिवस आहे. जागतिक हवामान संघटना हवामानचा महत्त्वपूर्ण डेटा मिळून देत असते. त्यामुळे आपल्याला हवामानबद्दल समजते. वातावरणमध्ये होत असलेल्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या संरक्षण करण्यासाठी ठोस पावले आता उचलणे आवश्यक आहे.

जागतिक हवामान कधी केला गेला साजरा ? : हवामान अंदाज आणि हवामान बदल कमी करण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या दिवशी अनेक कार्यक्रम आणि मोहिम राबवल्या जातात. जागतिक हवामान दिन पहिल्यांदा 1951 मध्ये साजरा करण्यात आला. हवामानशास्त्र, जलविज्ञान क्षेत्रातील, जागतिक हवामान आणि प्रत्येक देशांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. हवामान आणि हवामानाशी संबंधित माहितीच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आता खूप गंभीरपणे प्रयत्न केले जात आहे. वाढत्या प्रदूषण आणि तापमामुळे आता वेगवेगळ्या स्तरावरून काम केले जात आहे.

हेही वाचा :

  1. या दिवशी जगभरात एक तास अंधार असेल, जाणून घ्या काय आहे 'अर्थ अवर' - Earth hour 2024
  2. दिल्ली विद्यापीठाच्या तळघरात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव होते कैद, इथं आजही गर्जतो 'इन्कलाब झिंदाबाद'चा नारा - Shaheed diwas 2024
  3. World Forest Day 2024: जागतिक वनदिन, काय आहे महत्त्व आणि इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details