अमरावती/वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केलाय. त्यानंतर आता ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. या विजयानंतर ट्रम्प यांचे साथीदार तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते जे डी व्हॅन्स यांच्यावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यामुळं व्हॅन्स यांच्या पत्नी उषा व्हॅन्स या अमेरिकेच्या सेकंड लेडी म्हणून ओळखल्या जाणार आहेत. उषा व्हॅन्स यांचं भारताशी खास नातं असल्यानं अमेरिकेच्या 'सेकंड लेडी' झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जात आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी दिल्या शुभेच्छा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी उषा व्हॅन्स यांचं अभिनंदन केलंय. तसंच तेलुगु समाजासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही ते म्हणालेत. यासंदर्भात चंद्राबाबू नायडू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणालेत की,"जे डी व्हॅन्स यांचं अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो. त्यांचा हा विजय एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण, उषा चिलुकुरी व्हॅन्स या मुळ आंध्र प्रदेशातील आहेत. युनायटेड स्टेट्सची सेकंड लेडी म्हणून काम करणाऱ्या त्या तेलुगु वारशाच्या पहिली महिला ठरतील."
I would also like to extend my heartfelt congratulations to Mr. @JDVance, on becoming the US Vice President-elect. His victory marks a historic moment, as Mrs. Usha Vance, who has roots in Andhra Pradesh, will become the first woman of Telugu heritage to serve as the Second Lady…
— N Chandrababu Naidu (@ncbn) November 6, 2024
उषा व्हॅन्स यांच्या गावात दिवाळी : पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वडालुरू गावात बुधवारी (6 नोव्हेंबर) पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी साजरी करण्यात आली. नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. जे डी व्हॅन्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी व्हॅन्स या मूळच्या भारतीय असून त्या वडालुरू गावातील आहेत. त्यामुळं ट्रम्प यांच्या विजयाची माहिती मिळताच नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
कोण आहेत उषा व्हॅन्स? : लेखक, तत्कालीन रिपब्लिकन सिनेटर आणि आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना पत्नी उषा चिलुकुरी व्हॅन्सची साथ लाभली. उषा चिलुकुरी या हिंदू धर्मीय आहेत. तर त्यांचे पती जेडी व्हॅन्स हे रोमन कॅथलिक आहेत. भारतीय वंशाच्या उषा चिलुकुरी यांचं बालपण सॅन दिएगो शहरात गेले. कॉलेजनंतर त्यांनी येल येथून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. उषा आणि जेडी व्हॅन्स यांची पहिली भेट येले लॉ स्कूलमध्येच झाली होती. येलेमधून लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केलं. हे लग्न अमेरिकेतील केंटकी राज्यात हिंदू परंपरेनूसार पार पडलं. उषा आणि जेडी व्हॅन्स यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी दोन मुलांचे नाव इवान आणि विवेक आहे, तर मुलीचं नाव मीराबेल आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत उषा चिलुकुरी व्हॅन्स या वकील आणि न्यायिक लिपिक म्हणून काम करत होत्या.
हेही वाचा -