दांबुला (श्रीलंका) SL vs NZ 1st T20I Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 2 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 10 नोव्हेंबर (रविवार) रोजी रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला इथं खेळवला जाईल. कर्णधार चरिथ असलंकाच्या 28 चेंडूत नाबाद 35 धावांच्या बळावर श्रीलंकेनं दांबुला इथं पहिला T20 सामना चार गडी राखून जिंकला, यात कुसल परेरा, कामिंदू मेंडिस आणि वानिंदू हसरंगा यांनीही शानदार फलंदाजी केली. तर गोलंदाजीत ड्युनित वेलाझक्वेझ आणि मथिशा पाथिराना यांनी पाहुण्या संघाची फलंदाजी कमकुवत केली. दुसरीकडं या मालिकेत 0-1 नं पिछाडीवर गेलेल्या न्यूझीलंड आजचा दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
Next up: white ball cricket in Sri Lanka!
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 7, 2024
Watch all matches LIVE in NZ on @skysportnz 📺 LIVE scoring at https://t.co/3YsfR1YBHU or the NZC app 📲 #SLvNZ #CricketNation #Cricket pic.twitter.com/qKb8z4usu9
पहिल्या सामन्यात काय झालं : दरम्यान, पहिल्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 20 धावा करुन संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 19.3 षटकात केवळ 135 धावा करुन बाद झाला. न्यूझीलंडसाठी झॅचरी फॉक्सनं सर्वाधिक नाबाद 27 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेसाठी दुनित वेलालेजनं सर्वाधिक दोन बळी घेतले. दुनिथ वेलालेजशिवाय नुवान तुषारा, वानिंदू हसरंगा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंकेचा 4 विकेटनं विजय : लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नाही आणि अवघ्या तीन धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. मात्र तरीही श्रीलंकेच्या संघानं 19 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठलं. श्रीलंकेसाठी कर्णधार चारिथ असलंकानं 35 नाबाद धावांची शानदार खेळी केली. चरिथ असलंकाशिवाय कुसल परेरा आणि कमिंडू मेंडीसनं 23-23 धावा केल्या. न्यूझीलंडकडून झॅकरी फॉक्सनं सर्वाधिक तीन बळी घेतले. झॅचरी फॉल्केसशिवाय मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
The hosts take a 1-0 lead in the two-match T20I series. Zak Foulkes finishing with career-best T20I figures of 3-20, to add to his unbeaten 27 with the bat. Catch up on all scores https://t.co/ixfcmwStvd 📲 #SLvNZ #CricketNation 📸 = SLC pic.twitter.com/FUdFTDmdkU
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 9, 2024
घरच्या मैदानावर श्रीलंकेची चमकदार कामगिरी : T20 विश्वचषकापासून श्रीलंका संघ घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे. श्रीलंकेनं नुकतंच T20 आणि वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडला तगडे आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ भारताला कसोटी मालिकेत 3-0 नं पराभूत करुन या मालिकेत प्रवेश करेल. श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत करणं किवी संघासाठी इतकं सोपं नसेल. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक मालिका पाहायला मिळणार आहे.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 9 नोव्हेंबर, दांबुला (श्रीलंका 4 विकेटनं विजयी)
- दुसरा T20 सामना : आज
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : आतापर्यंत आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंडचे संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात न्यूझीलंडचा वरचष्मा राहिला आहे. यापैकी 13 सामने किवींनी जिंकले आहेत, तर श्रीलंकेनंही 10 सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. मात्र, पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पराभूत करुन आपली ताकद दाखवली आहे, त्यामुळं मालिकेतील दुसरा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेच्या घरच्या परिस्थितीत खेळणं किवी संघासाठी आव्हानात्मक ठरु शकतं.
खेळपट्टी कशी असेल : रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळते. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व असलं तरी सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजी करणं थोडं कठीण असते. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 142 आहे. सामन्यात दव आल्यानं पाठलाग करणं थोडं सोपं होतं. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
A captain's knock from Charith Asalanka 🙌
— ICC (@ICC) November 9, 2024
Sri Lanka seal a tense run-chase to go 1-0 up against New Zealand in the T20I series 👊#SLvNZ 📝: https://t.co/jrFz1pB3a4 pic.twitter.com/DcmW58oyi3
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. तर याच्या अर्धा तासआधी नाणेफेक होईल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना कुठं आणि कसा पहायचा?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड T20I मालिका 2024 भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाईल. याशिवाय या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाइव्ह ॲप आणि फॅनकोड ॲपवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून दुसऱ्या T20 सामन्याचा आनंद घेता येईल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
न्यूझीलंड संघ : टिम रॉबिन्सन, विल यंग, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिच हे (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर (कर्णधार), जोश क्लार्कसन, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, झॅचरी फॉल्केस, नॅथन स्मिथ, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डीन फॉक्सक्रॉफ्ट
श्रीलंका संघ : पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कुसल परेरा, दिनेश चंडीमल, चारिथ असालंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालेज, असिथा फर्नांडो, नुवान थुशारा, मथिशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, मथिशा पथिराना वांडरसे, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, महेश थिक्षणा
हेही वाचा :