रायपूर : मध्यरात्री कर्तव्यावर असताना स्टेशन मास्तरचं बायकोशी कडाक्याचं भांडण झालं. मात्र या भाडंणामुळे रेल्वे विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे नवरा बायकोचं हे भांडण अखेर उच्च न्यायालयात गेल्यानं न्यायालयानं स्टेशन मास्तरला घटस्फोट मंजूर केला. हे अनोखं तितकच धक्कादायक प्रकरण दुर्ग जिल्ह्यातील भिलई इथं उघडकीस आलं. मध्यरात्री बायकोशी भांडताना स्टेशन मास्तर ओके म्हणाले, मात्र त्यामुळे रेल्वे प्रतिबंधित नक्षलग्रस्त परिसरात गेली. यामुळे रेल्वेला तब्बल 3 कोटी रुपयांचा चुना लागला. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर स्टेशन मास्तरची पत्नी त्यांच्यावर माणसिक क्रूरता करत असल्याचं न्यायालयानं मान्य करत त्यांना घटस्फोट दिला.
मध्यरात्री पत्नीशी भांडताना रेल्वे घुसली प्रतिबंधित नघलग्रस्त भागात : विशाखापट्टणम येथील व्यंकटगिरी राव ड्युटीवर असताना जून 2012 मध्ये रात्री त्यांचं त्यांच्या पत्नीशी भांडण सुरू झालं. कर्तव्यावर असताना मध्यरात्रीपर्यंत या पती पत्नीचं भांडण सुरू होतं. त्यांचा वाद वाढत गेल्यानंतर त्यांना सिग्नल मॅननं रेल्वे गाडीच्यासिग्नलसंबधात विचारणा केली. यावेळी भांडणात मश्गुल असलेले स्टेशन मास्तर व्यंकटगिरी यांनी सिग्नल मॅनला त्यांनी तणावपूर्ण परिस्थितीत ओके असं म्हटलं. मात्र, या 'ओके'चा सिग्नल मॅननं चुकीचा अर्थ लावला. त्यामुळे त्यानं रेल्वेला पुढं नेलं. मात्र स्टेशन मास्तरच्या ओकेचा अर्थ घेऊन लोको पायलटनं रेल्वेला प्रतिबंधित नक्षलग्रस्त परिसरात नेलं. या नक्षलग्रस्त परिसरात जाण्यासाठी रेल्वेला रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत रेल्वे वाहतूक प्रतिबंधित आहे. या गडबडीत रेल्वेचं 3 कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे व्यंकटगिरी राव यांना रेल्वे विभागानं निलंबित केलं.
बायकोच्या भांडणातून रेल्वे घुसली नक्षलग्रस्त परिसरात : घरात सतत बायको भांडण करत असल्यानं व्यंकटगिरी हे सतत तणावात असल्याचा दावा त्यांनी केला. स्टेशन मास्तर व्यंकटगिरी राव यांनी दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी विशाखापट्टणम कौटुंबीक न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे त्यांच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका करुन पती हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे हे प्रकरण दुर्ग कौटुंबीक न्यायालयात वर्ग करण्यात आलं. मात्र हुंड्यासाठी छळ केल्याचं सिद्ध न झाल्यानं न्यायालयानं त्यांच्या पत्नीची याचिका फेटाळून लावली. यानंतर व्यंकटगिरी राव यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यांचे वकील, विपिन तिवारी यांनी न्यायालयात, जोडप्याच्या वैवाहिक भांडणामुळे व्यंकटगिरी राव यांच्या मनःशांतीवर परिणाम झाला. त्या रात्री फोनवर झालेला वाद हा सतत होणाऱ्या भांडणातूनच झाला होता. 5 नोव्हेंबरला बिलासपूर इथल्या उच्च न्यायालयानं त्यांची घटस्फोटाची याचिका मंजूर केली. व्यंकटगिरी यांच्या पत्नीचं वागणं मानसिक क्रूरता आहे.
पत्नीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथपालाशी अनैतिक संबंधाचा आरोप : व्यंकटगिरी राव आणि त्यांच्या पत्नीनं एप्रिल 2011 मध्ये लग्न केलं. मात्र सुरुवातीपासूनच त्यांचं नातं कटुतेचं होतं. लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्या पत्नीनं अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथपालाशी संबंध असल्याचं कबूल केलं, असा आरोप व्यंकटगिरी राव यांनी केला. पत्नी तिच्या प्रियकराशी असलेले संबंध तोडेल असं, तिनं आणि तिच्या कुटुंबीयांकडून आश्वासन दिलं, मात्र त्यात कोणताही फरक पडला नाही. यातूनचं तिनं व्यंकटगिरी राव आणि त्यांच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. मात्र उच्च न्यायालयात हुंड्यासाठी छळ झाल्याचा कोणताही पुरावा न्यायालयाला सापडला नाही.
पत्नीनं मानसिक क्रूरता केल्याचं उघड : व्यंकटगिरी राव यांच्या वकिलानं सांगितलं की, बिलासपूर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पत्नीनं पती आणि इतर नातेवाईकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा खोटा आरोप केल्याचं आढळून आलं. हुंड्याची रक्कम केव्हा आणि कशी दिली, हे उच्च न्यायालयात पत्नीला सिद्ध करता आलं नाही. छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती संजय कुमार जयस्वाल यांच्या खंडपीठानं पत्नीचं हे वर्तन क्रूरता मानलं आणि दुर्ग कौटुंबीक न्यायालयाचा निर्णय रद्द केला.