सिडनी Most Sixes in Women's T20 Match : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीगच्या 21व्या सामन्यात होबार्ट हरिकेन्सनं पर्थ स्कॉचर्सचा 72 धावांनी पराभव केला. या सामन्यात लिझेल लीनं होबार्ट हरिकेन्ससाठी अशा प्रकारे फलंदाजी केली जी महिला क्रिकेट सामन्यात क्वचितच पाहायला मिळते. तिनं विरोधी संघाच्या गोलंदाजांचा पुरेपूर फायदा घेत झंझावाती दीडशतक झळकावलं. तिच्या चमकदार कामगिरीसाठी तिला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले.
All on board! 🚂
— Hobart Hurricanes (@HurricanesBBL) November 10, 2024
What a win! A dominant display from Lizelle Lee and we leave the SCG with a win 🌪 pic.twitter.com/NCimpK3eOG
लिझेल लीची 150 धावांची उत्कृष्ट खेळी : लिझेल लीनं अवघ्या 75 चेंडूत 150 धावा केल्या. या खेळीत तिनं 12 चौकार आणि 12 षटकार मारले. महिला बिग बॅग लीगच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तसंच यासह लिझेल ली महिला क्रिकेटच्या कोणत्याही T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारी खेळाडू ठरली आहे. तिनं ग्रेस हॅरिस आणि लॉरा अगाथा यांचा जागतिक विक्रम मोडला आहे. या दोन्ही खेळाडूंच्या नावावर महिला T20 सामन्यात प्रत्येकी 11 षटकार मारण्याचा विक्रम होता. आता लिझेल लीनं तिच्या इनिंगमध्ये 12 षटकार मारुन शानदार कामगिरी केली आहे.
महिला T20 क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारी खेळाडू :
- लिझेल ली (होबार्ट हरिकेन्स) - 12
- ग्रेस हॅरिस (ब्रिस्बेन हीट) - 11
- लॉरा अगाथा (ब्राझील) - 11
- ऍशले गार्डनर (सिडनी सिक्सर्स) - 10
- डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज) - 9
Lizelle Lee
— Hobart Hurricanes (@HurricanesBBL) November 10, 2024
Most ever sixes and the highest ever score in WBBL History, what an innings! pic.twitter.com/nzX748WXn6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही आक्रमक खेळी कायम : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही 32 वर्षीय लिझेल ली जगभरातील T20 लीगमध्ये खेळत आहे. 10 नोव्हेंबर रोजी तिनं एक खेळी खेळली जी WBBL च्या इतिहासात अजरामर झाली. तिनं या T20 लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आणि या प्रकरणात ऑस्ट्रेलियाची फलंदाज ग्रेस हॅरिसचा गेल्या मोसमात केलेला 136 नाबाद धावांचा विक्रम मोडला.
One for the history books!
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 10, 2024
Lizelle Lee's WBBL record 150* included 12 ridiculous sixes 😱
Enjoy it all 🎥 #WBBL10 pic.twitter.com/TbpABk1Mr6
होबार्ट हरिकेन्सनं केल्या 203 धावा : लिझेल लीमुळंच होबार्ट हरिकेन्स संघ 200 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. लीझेलशिवाय हीथर ग्रॅहमनं संघाकडून 23 धावा केल्या. एलिस व्हिलानीनं 14 धावांचं योगदान दिलं. संघानं 20 षटकांत 203 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पर्थ स्कॉचर्सचा संघ 131 धावांत सर्वबाद झाला आणि पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही आणि 72 धावांनी सामना गमावला.
हेही वाचा :