हैदराबाद High Temperature During Holi : दरवर्षी हिवाळा संपल्यानंतर मार्च महिन्यात लोकांमध्ये होळीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. भारतात होळी हा सण वेगवेगळ्या रंगांनी साजरा केला जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी होळी सणाच्या काळात तापमानाचा पारा वाढत असल्याचं बघायला मिळतंय. पण असं होण्याचं कारण काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
क्लायमेट कंट्रोलचे संशोधन काय म्हणते : यूएस-स्थित क्लायमेट सेंट्रलच्या नवीन विश्लेषणातून असं दिसून आलंय की, मार्च आणि एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतातील हवामानात तापमान वाढ होत जाते. 1970 पासूनच्या डेटाचे विश्लेषण करताना, अभ्यासात असा दावा करण्यात आलाय की मार्चमध्ये उत्तर आणि पश्चिम भागात सर्वाधिक उष्णतेचा अनुभव येतो. यामध्ये सर्वात मोठा बदल जम्मू आणि काश्मीरमध्ये (2.8 अंश सेल्सिअस) होतो. तर मिझोरममध्ये 1970 (1.9 अंश सेल्सिअस) नंतरचा सर्वात मोठा फरक नोंदवल्यानं एप्रिलमधील तापमान अधिक एकसमान राहिलंय. होळीच्या अनुषंगानं, मिझोरममध्ये 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला तापमान क्वचितच 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले होते.
या वर्षी 9 राज्यांच्या तापमानात वाढ : महाराष्ट्र, बिहार आणि छत्तीसगड ही तीन राज्य या तापमानापर्यंत पोहोचण्याची 5 टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. तर, या वर्षीच्या हवामानात, 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता 9 राज्यांपर्यंत वाढली आहे. .यामध्ये 3 मुख्य राज्यांसह राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र (14 टक्के) यांचा समावेश आहे. देशभरातील 51 प्रमुख शहरांमधील संभाव्यतेतील तफावत लक्षात घेता, एकूण 37 शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक गरम राहण्याची 1 टक्के शक्यता आहे, आणि 11 शहरांमध्ये 10 टक्के किंवा त्याहून अधिक तापमानाची शक्यता आहे.