महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोण आहेत 'झारखंड टायगर' चंपाई सोरेन? हेमंत सोरेन यांच्या जागी बनणार राज्याचे नवे मुख्यमंत्री - चंपाई सोरेन

Jharkhand CM : हेमंत सोरेन यांच्या जागी झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज असलेले चंपाई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) चे उपाध्यक्ष आहेत. ते JMM संस्थापक शिबू सोरेन यांचे निष्ठावंत मानले जातात.

Jharkhand CM
Jharkhand CM

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 10:29 PM IST

रांची Jharkhand CM : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे सोरेन कुटुंबाच्या अगदी जवळचे मानले जातात.

सलग चारवेळा आमदार : चंपाई सोरेन सलग 4 टर्मपासून सरायकेला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. याआधी त्यांना 2000 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भाजपाचे तत्कालीन उमेदवार अनंत राम तुडू यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र तेव्हापासून ते सातत्यानं विधानसभा निवडणुकीत विजयी होत आहेत. 2010, 2013 आणि 2019 मध्ये ते झारखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले.

सामान्य शेतकरी कुटुंबाचा वारसा : चंपाई सोरेन एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात. ते त्यांच्या चार भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. त्यांचे वडील सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोरा गावात शेती करायचे. चंपाई वडिलांना शेतीत मदत करत असे. त्यांनी सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांचं लहान वयातच मानको यांच्याशी लग्न झालं. चंपाई सोरेन यांना 3 मुलं आणि 2 मुली आहेत.

झारखंड चळवळीत महत्त्वाची भूमिका :चंपाई सोरेन यांचं झारखंड चळवळीत मोठं योगदान आहे. ते शिबू सोरेन यांच्यासोबत आंदोलनात सामील झाले होते. यानंतर ते 'झारखंड टायगर' या नावानं प्रसिद्ध झाले. चंपाई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार बनून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.

अनेक महत्त्वाची मंत्रीपदं सांभाळली : चंपाई सोरेन 2010 ते 2013 पर्यंत भाजपा नेते अर्जुन मुंडा यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मंत्रीमंडळात त्यांना महत्त्वाची मंत्रिपदं देण्यात आली होती. यानंतर झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. नंतर राज्यात झामुमोचं सरकार स्थापन झालं आणि त्यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. ते 13 जुलै 2013 ते 28 डिसेंबर 2014 पर्यंत मंत्री होते.

झामुमोचे उपाध्यक्षाही आहेत चंपाई सोरेन : 2019 मध्ये राज्यात पुन्हा जेएमएम सरकार स्थापन झालं आणि हेमंत सोरेन मुख्यमंत्री बनले. तेव्हा चंपाई सोरेन यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं. यावेळी त्यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आलं. चंपाई सोरेन हे झामुमोचे उपाध्यक्षाही आहेत. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांची झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

हे वाचलंत का :

  1. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा, ईडीनं घेतलं ताब्यात; चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details