हैदराबाद (तेलंगाणा) Onion Effect On Human Body : जगभरात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात. या सर्वांमध्ये कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो; कारण कांदा हा अन्नातील महत्त्वाचा घटक आहे. कांदा जेवणात वापरल्यानं त्याची चव दुप्पट होते, असं तज्ञांच मत आहे. विशेषतः भाज्यांमध्ये याचा वापर केला जातो. आपण रोज जे काही बनवतो, मग ती भाजी असो, बिर्याणी असो किंवा स्नॅक्स असो, त्यात कांदा टाकला जातो यात शंका नाही.
कांद्यामध्ये असतात हे घटक : तुम्ही महिनाभर कांदा खाणं बंद केलं तर काय होईल? कांदा टाळणं शरीरासाठी चांगलं की वाईट? आम्हाला कळू द्या. कांदा शरीर निरोगी ठेवतो, महिनाभर कांदा पूर्णपणे टाळल्यानं बद्धकोष्ठतेपासून दृष्टीपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात. वरिष्ठ आहारतज्ञांच्या मते, कांद्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीर निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6 मोठ्या प्रमाणात आढळतात आणि यासोबतच फोलेटमुळे रोगप्रतिकारक शक्ती, पेशींची वाढ आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते. ऍलिसिन आणि क्वेर्सेटिन सारख्या दाहक-विरोधी गुणधर्मांबरोबरच, अँटीऑक्सिडंट आणि कर्करोगविरोधी गुणधर्म देखील कांद्यामध्ये आढळतात. ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
कांदा टाळल्यास या समस्या उद्भवतात : महिनाभर कांद्यापासून दूर राहिल्यास काय होईल, महिनाभर कांदा खाणे बंद केलं तर शरीरात मोठे बदल होणार नाहीत; परंतु काही छोटे बदल नक्कीच होतील, असं तज्ञांचं म्हणणं आहे. कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, जे निरोगी पचनसंस्थेसाठी आवश्यक असते. त्यामुळे ते टाळल्यास अपचन तसेच बद्धकोष्ठता सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.