केरळ(वायनाड) Wayanad Landslide Rescue Operations : वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत जळपास 250 जणांचा मृ्त्यू झाला असून, हजारोंच्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी आताही मदत आणि बचाव कार्य राबवलं जात आहे.
जवळपास 250 जणांचा मृत्यू : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीच्या डोंगराळ भागात भूस्खलनात मृतांची संख्या 249 वर पोहोचली आहे. मंगळवारी ही दुर्घटना घडली होती. आज तीन दिवसानंतरही या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दलाची मदत या मदत कार्यासाठी घेतली जात आहे. मंगळवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं भूस्खलनात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित रस्क्यू करण्यात आलं.
आम्ही ३० जुलैच्या सकाळपासून केरळ सरकार आणि दुर्घटनेतील नागरिकांच्या मदतीसाठी आलो आहोत. आम्ही १०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत आणि एकूण मृतदेहांची संख्या खूप जास्त आहे. यातील अनेक नागरिकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. घरांमध्ये जाऊन लोक अडकले आहेत का ते आम्ही आता पाहत आहोत. जड उपकरणं घटनेच्या ठिकाणी आणण्यासाठी पूल बांधण्यात येत होता. तो आता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळं शोध आणि बचाव कार्याची गती वाढेल - मेजर जनरल मॅथ्यू