दावणगेरे (कर्नाटक) Villagers Find Bride For Marriage :कर्नाटकातील दावणगेरे येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. येथे ग्रामस्थांनी ग्रामसेवकास लग्नासाठी चक्क वधू शोधून दिली. विशेष म्हणजे, सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याच्या विवाहाचा खर्च उचलला आहे.
गावकऱ्यांनी थाटामाटात लग्न लावून दिलं : दावणगेरे तालुक्याच्या गुडाळ ग्रामपंचायतीचे सदस्य अंजिनाप्पा यांनी शुक्रवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वैवाहिक जीवनात प्रवेश केला. आपल्या धाकट्या बहिनींकडे लक्ष देण्यासाठी अंजिनाप्पा यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामस्थांच्या दबावापुढे अखेर त्यांना झुकावं लागलं. गावकऱ्यांनी त्यांचं अतिशय थाटामाटात लग्न लावून दिलं आहे.
सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी : दलित समाजातून येणारे 45 वर्षीय अंजिनाप्पा गावात सर्वांना प्रिय आहेत. त्यांनी आपल्या गावात अनेक विकासकामं केलीत. ते आपल्या ओमिनी कारमध्ये रुग्णवाहिकेच्या रूपानं गावातील लोकांना आपत्कालीन सेवा देतात. इतकंच नाही तर, ते गावातल्या लोकांचं कुठलंही काम लगेच करतात. लोकांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. यामुळे अंजिनाप्पा सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले आहेत.
लग्नाचा सर्व खर्च गावकऱ्यांनी उचलला : घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अंजीनाप्पानं लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गावकऱ्यांनी त्यांना लग्न करण्यास भाग पाडलं. गावकऱ्यांनी स्वतः वधू शोधून आणली आणि त्यांच्या लग्नाची सर्व तयारी केली. अंजिनाप्पाचा विवाह सोहळा गावातील सर्वांनी जात, भेदभाव न पाळता पार पाडला. "आम्ही सर्व वर्गांना सोबत घेऊन हे कार्य केलं आहे. लग्नातील पाण्याची व्यवस्था, शामियाना, भोजन, खुर्चीसह सर्व खर्च ग्रामस्थांनी केला आहे. संपूर्ण गावानं हा विवाह अगदी अनोख्या पद्धतीनं साजरा केला", असं ग्रामस्थ म्हणाले.
हे वाचलंत का :
- ऐकावं ते नवलच! अवघ्या 50 दिवसांच्या मुलीचे 36 सरकारी कागदपत्रं; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव