जम्मू-काश्मीरTerrorist attack in Panara village:जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारात व्हिलेज डिफेन्स गार्डचा (व्हीडीजी) जवानाला वीरमरण आले. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्याची शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी सकाळी सव्वा आठच्या सुमारास संशयित दहशतवाद्यांशी सैन्याची चकमक झाली.
सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं की, "दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर बसंतगढच्या पनारा गावात सकाळी 7:45 च्या सुमारास, पोलीस तसंच व्हीडीजीच्या गस्त पथकांशी संशयित दहशतवाद्यांचा सामना झाला. त्यानंतर गोळीबाराची माहिती मिळाली. अर्ध्या तासाहून अधिक काळ चाललेल्या गोळीबारानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेनं पळून गेले. सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळं खानेड येथील व्हीडीजी सदस्य मोहम्मद शरीफ हे गोळी लागल्यानं गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय."
सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक :त्याचवेळी, पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं की, "शनिवारी संध्याकाळी उशिरा संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींबद्दल माहिती मिळाल्यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांनी बसंतगढ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरक्षा ग्रीड सक्रिय केलं होतं. त्यानंतर आज सकाळी व्हीडीजी सदस्यांसह पोलीस चोचरू गाला हाइट्सच्या दिशेनं जात असताना लपलेल्या दहशतवाद्यांशी सैन्याची चकमक झाली. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे."
नवीन शस्त्रं देण्याची मागणी : 'आम्ही अनेक वर्षांपासून भारत मातेची सेवा करत आहेत. जेव्हाही त्यांच्या परिसरात दहशतवादी हल्ला होतो, तेव्हा आम्ही जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत दहशतवाद्यांशी लढा देतो. मात्र, आम्हाला दिलेलं शस्त्र फार जुने असल्याचंही निदर्शनास आलं. आम्हाला नवीन शस्त्रे द्यावीत तसंच वेतनही वाढवावे," अशी मागणी व्हिलेज डिफेन्स गार्डनं सरकारकडं केलीय'.
हे वाचलंत का :
- दर्ग्यात दहशतवाद्यांच्या प्रवेश झाल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अटक
- ISIS दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील सहा प्रमुख आरोपींवर आरोपपत्र दाखल
- दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; अजान पठण करताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू