बंगळुरूSAVARKAR VS GANDHI-कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी पुन्हा एकदा गांधी विरुद्ध सावरकर या विचारसणीवर भाष्य केलं. ते एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "सावरकरांच्या कट्टरतावादाचा सामना करण्याचा खरा मार्ग म्हणजे गांधींची लोकशाही तत्त्वे आणि त्यांचा दृष्टिकोन आहे."
कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले, " महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसेसारखा कट्टरतावादी हा सावरकरांच्या विचारसरणीतून निर्माण झाला होता. तो जे करत होतो, त्याला योग्यच वाटते. अशा विचारसणीच्या लोकांना मोठे कार्य करत असल्याचं वाटतं. त्यामुळे सावरकरांचा कट्टरतावाद हा धोकादायक आहे. पुढे म्हणाले, " गांधी अत्यंत धार्मिक असूनही ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. त्यांचा लोकशाही प्रक्रियेवर कायम विश्वास दाखविला होता. सर्वाना सोबत घेण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे मला वाटते, त्यांचा सर्वोत्तम दृष्टीकोन होता."
कशामुळे झाला होता वाद?कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. सावरकर ब्राह्मण असूनही मांसाहारी असल्याचा दावा मंत्र्यांनी केला. एवढेच नाही तर मोहम्मद अली जिनांपेक्षा जास्त कट्टरपंथी असे सावरकरांचे त्यांनी वर्णन केले. मंत्री गुंडू राव यांच्या विधानानं भाजपामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
काय म्हणाले दिनेश गुंडू राव?कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले, " वीर सावरकर हे ब्राह्मण होते. पण गोमांस खात होते. मासांहारी होते. त्यांनी गोहत्येला कधीच विरोध केला नाही. या विषयावरील त्यांचे विचार त्यांचे आधुनिक होते. त्यांचे विचार एका बाजूला कट्टरवादी तर दुसरीकडे त्यांनी आधुनिकतेचादेखील स्वीकार केला. ब्राह्मण असल्यानं त्यांनी उघडपणे मांस खाऊन प्रचार केल्याचं, काही लोकांनी म्हटलं होतं."
सावरकर कट्टरपंथीय होते-पुढे ते म्हणाले," महात्मा गांधी हे कर्मठ शाकाहारी होते. हिंदू सांस्कृतिक रुढीवादावर त्यांचा गाढा विश्वास होता. गांधींना हे लोकशाहीवादी व्यक्ती आणि विचारानं पुरोगामी होते. मोहम्मद अली जिन्ना यांचा संदर्भ देत ते म्हणाले, "जिना हे कधीही कठोर इस्लामवादी नव्हते. काहीजण म्हणतात की, त्यांनी डुकराचे मांसही खाल्ले. तथापि, ते नंतर एक आदर्श ठरले. जिना हे कधीही कट्टरपंथी नव्हते. परंतु सावरकर कट्टरपंथीय होते."
थोर नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न-भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी गुंड राव यांच्या वादग्रस्त विधानावर टीका केली. नक्वी म्हणाले, " काही लोक स्वतःला इतरांपेक्षा जास्त ज्ञानी दाखवण्याच्या नादात थोर नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे तथ्यहीन दावे देशाच्या समृद्ध इतिहासाबद्दल त्यांचे अज्ञान दर्शवतात. तसेच त्यांच्या मानसिक स्थितीचेही दर्शन त्यातून घडते. असे बोलणारे अज्ञानी असून देशाचा इतिहास, मूल्ये, संस्कृती आणि महान व्यक्तिमत्त्वांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण, ते देश मान्य करणार नाही."