नवी दिल्ली Cricketer Yusuf Pathan TMC Lok Sabha Candidate : भारताचा माजी आक्रमक क्रिकेटपटू युसूफ पठाण आता लोकसभेच्या रिंगणात उतरलाय. युसूफ पठाण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तृणमूल काँग्रेसनं त्याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं आता युसूफ पठाण आणि अधीर रंजन चौधरी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 'इंडिया' आघाडीत असताना, त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिल्यानं त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेरचा रस्ता धरल्याचं चित्र येथे पाहायला मिळत आहे.
हाय वोल्टेज सामना होण्याची शक्यता : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये कांठी येथून उत्तम बारीक, घाटल येथून अभिनेते देब, कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीने महुआ मोईत्रा, तसंच युसुफ पठाणला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी बहरमपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा बहरमपूरमध्ये युसूफ पठाण विरुद्ध अधीर रंजन यांच्यात हाय वोल्टेज सामना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
मतं विभागण्याची शक्यता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. आता त्यांनी थेट उमेदवारांची यादी जाहीर करत यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूलची मतं विभागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल शिवाय तृणमूल काँग्रेस आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार आहे. तसंच अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील एक जागाही लढवण्याचा ममता बॅनर्जी यांचा विचार आहे.
TMC उमेदवार खालीलप्रमाणे :
- कूच बिहार-जगदीश सी बसुनिया
- अलीपुरद्वार- प्रकाश चिक बडाइक
- जलपाईगुडी-निर्मल चौधरी रॉय
- दार्जिलिंग- गोपाल लामा
- रायगंज- कृष्णा कल्याणी
- बालूरघाट- बिप्लब मित्र
- मालदा उत्तर- प्रसून बॅनर्जी
- मालदा दक्षिण - शाहनवाज अली रैहान
- जंगीपूर- खलीलुर रहमान
- बहरामपूर- युसूफ पठाण
- मुर्शिदाबाद – अबू ताहेर खान
- कृष्णनगर- महुआ मोईत्रा
- राणाघाट- मुकुट मणि अधिकारी
- बोंगाव- विश्वजित दास
- बॅरकपूर-पार्थ भौमिक
- दम दम - सौगता रॉय
- बारासात- काकोली घोष दस्तीदार
- बशीरहाट- हाजी नुरुल इस्लाम
- जयनगर- प्रतिमा मंडळ
- मथुरापूर- बापी हलदर
- डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी
- जाधवपूर- सयानी घोष
- कोलकाता दक्षिण- माला रॉय
- कोलकाता उत्तर- सुदीप बॅनर्जी
- हावडा- प्रसून बॅनर्जी
- उलुबेरिया- सजदा अहमद
- श्रीरामपूर- कल्याण बॅनर्जी
- हुगळी- रचना बॅनर्जी
- आरामबाग- मिताली बाग
- तमलूक- देवांशू भट्टाचार्य
- कंठी - छान बारीक
- घाटाळ-देव
- झारग्राम- कालीपद सोरेन
- मेदिनीपूर - जून मलिया
- पुरुलिया- शांतीराम महत
- बांकुरा- अरुप चक्रवर्ती
- बर्दवान पूर्व – डॉ. शर्मिला सरकार
- बर्दवान दुर्गापूर - कीर्ती आझाद
- आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
- बोलपूर – असित मल
- बीरभूम- शताब्दी रॉय
- विष्णुपूर- सुजाता मंडल खान