नवी दिल्ली SC Hearing On Tirupati Laddus : तिरुपती लाडू वादाशी संबंधित अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (30 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) माजी अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून वाटण्यात येणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ केल्याचा आरोप केला होता.
सीबीआय चौकशीची मागणी : न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. तर अधिवक्ता सत्यम सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक समिती स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसं न झाल्यास हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचिकेत नेमकं काय म्हटलंय? :याचिकेत म्हटलंय की, तिरुमला येथील लाडू प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी, माशांचं तेल आणि इतर मांसाहारी घटकांचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे. हे कृत्य हिंदू धार्मिक प्रथांचं उल्लंघन तर आहे. यामुळं असंख्य भाविकांच्या भावनाही दुखावल्या आहेत. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीची भेसळ करणं हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम 25 चे उल्लंघन आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वीच एसआयटी स्थापन केली आहे.
- दरम्यान, तिरुपतीच्या लाडूमधील कथित भेसळीनंतर वायएसआर काँग्रेसवर भाजपाकडून सातत्यानं टीका करण्यात येते.
हेही वाचा -
- सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात उंदीर? मंदिर ट्रस्टनं दिलं स्पष्टीकरण - Siddhivinayak Temple Mahaprasad
- लाडू प्रकरणावरून जगनमोहन रेड्डींचं पंतप्रधानांना पत्र; चंद्राबाबू नायडूंनी कारवाईचा दिला इशारा - Tirupati Laddu Controversy
- तिरुपती लाडूकरिता तूप पुरविणाऱ्या डेअरीची तपासणी, भेसळ झाली नसल्याचा कंपनीकडून दावा - Tirupati Laddu Controversy